Milk price Increase l अमूल, गोकूळ नंतर आता मदर डेअरीच्या दूध दरात वाढ!

increase-in-milk-price-of-mother-dairy-news-updte
increase-in-milk-price-of-mother-dairy-news-updte

नवी दिल्ली l पेट्रोल नंतर आता दूध दरांमध्ये देखील वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अमूल Amul आणि गोकूळ Gokul पाठोपाठ मदर डेअरीने Mother Dairy देखील दूध विक्री दरामध्ये २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांना रविवार 11 जुलैपासून मदर डेअरीचे दूध खरेदी करण्यासाठी २ रुपये जादा मोजावे लागणार आहे. Increase in milk price of Mother Dairy

मदर डेअरीचे नवीन दर उद्यापासून लागू होणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. मदर डेअरीने फक्त दिल्ली आणि एनसीआरमध्ये ही दरवाढ केली आहे. त्यामुळे दिल्ली-एनसीआर वगळता इतर भागातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये Delhi NRC एक लिटर क्रीम दूध ५५ रुपयांऐवजी आता ५७ रुपयांना मिळणार आहे आणि टोन्ड दूध ४५ रुपयांवरून ४७ रुपये झाले आहेत. यापूर्वी मदर डेअरीने २०१९ साली दूधाच्या दरांमध्ये वाढ केली होती. गेल्या वर्षभरात महागाई प्रचंड वाढली असून, कंपनीलाही या महागाईचा सामना करावा लागला. त्याचबरोबर कोरोना Corona महामारीमुळे दूध उत्पादनावरही परिणाम झाला असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Increase in milk price of Mother Dairy

तर यापूर्वी १ जुलै रोजी अमूलने दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार १ जुलैपासून दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथील अमूलचे दूध उत्पादन महागले. तब्ब्ल दीड वर्षानंतरअमूलने आपल्या दूध विक्रीचे दर वाढवले आहे. कोरोना संकटाच्या काळात महागाईला तोंड देणाऱ्या ग्राहकांना Costumers एकामागून एक धक्के बसत आहेत.

शुक्रवारी गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांना उद्यापासून म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपये, तर गाईच्या दूध दरात १ रुपयाची वाढ करण्यात निर्णय घेतला आहे. ही दरवाढ कोल्हापूर Kolpaur विभाग वगळता राज्यातील इतर भागात दूध विक्रीच्या दरात दोन रुपये वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा 

Coronavirus India Update l देशात २४ तासात आढळले ४२,७७६ कोरोना रुग्ण, १,२०६ रुग्णांचा मृत्यू!

Mumbai Covid Vaccination l लस घेण्यासाठी मुंबईकरांना आता थेट सोमवारची वाट पाहावी लागणार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here