‘उद्या धमाका,’ संजय राऊतांनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो

मुख्ममंत्री उध्दव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो promo केला शेअर

cm-uddhav-thackeray-interview-promo-shivsena-sanjay-raut
cm-uddhav-thackeray-interview-promo-shivsena-sanjay-raut

मुंबई l महाराष्ट्र विकास आघाडी Maha vikas Aghadi सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक,खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची विशेष मुलाखत घेतली आहे, ही मुलाखत शुक्रवारी प्रसिद्ध होणार. संजय राऊत यांनी ट्विटरला मुलाखतीचा प्रोमो promo शेअर केला आहे. उद्या धमाका होणार असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे विरोधकांच्या सर्व आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असं नाव देण्यात आलं आहे.  संजय राऊत यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना हे सरकार आपल्याच ओझाने पडेल अशी अनेक ज्योतिषं आणि भाकितं वर्तवली जात आहेत अशी विचारणा केली.

तुम्ही एक सूड काढा आणि १० सूड काढू

यासंबंधी उद्धव ठाकरेंनी भाष्य केलेलं दिसत असून असं बोलणाऱ्यांचे दात पडायला आले आहेत असा टोला लगावला आहे. “सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आणि १० सूड काढू,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.

“आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब, मुलं बाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही धुतळ्या तांदळ्याचे नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो,” असा इशाराही उद्धव ठाकरे देताना दिसत आहेत.

जास्त अंगावर आलात तर हात धुवून मागे लागेन”

मुख्यमंत्री हात धुवा याच्यापलीकडे काय सांगतात अशी एक टीका वारंवार विरोधकांकडून केली जाते. यासंबंधीबीही संजय राऊत यांनी विचारणा केलेली दिसत आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे की, “हात धुतो आहे.

हेही वाचा l प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक

जास्त अंगावर आलात तर हात धुवून मागे लागेन”. “विकृत बुद्धीचे चाळे करु नका. आव्हान मिळलं तेव्हा मला स्फुर्ती येते. आडवं येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढे जाईल,” असंही ते म्हणाल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.