Corona Update In India : देशात २४ तासांत २,८६,३८४ नव्या रुग्णांची नोंद, ५७३ जणांचा मृत्यू

india-corona-update-286384-new-covid19-cases-found-and-573-deaths-in-24-hours-news
india-corona-update-286384-new-covid19-cases-found-and-573-deaths-in-24-hours-news

नवी दिल्ली: देशातील आजच्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत ४७० रुग्णांची वाढ झाली. गेल्या २४ तासांत २ लाख ८६ हजार ३८४ रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ५७३ रुग्णांच्या मृत्यू झाला. ३ लाख ६ हजार ३५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या देशात २२ लाख २ हजार ४७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १९.५९ टक्के झाला आहे. आतापर्यंत १ अब्ज ६३ कोटी ८४ लाख ३९ हजार २०७ लसीकरण झाले आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ४ कोटी ३ लाख ७१ हजार ५००
देशातील एकूण मृत्यूची संख्या – ४ लाख ९१ हजार ७००
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – ३ कोटी ७६ लाख ७७ हजार ३२८
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – २२ लाख ०२ हजार ४७२
देशातील एकूण चाचण्यांची संख्या – ७२ कोटी २१ लाख ६६ हजार २४८
देशातील एकूण लसीकरणाची संख्या – १ अब्ज ६३ कोटी ८४ लाख ३९ हजार २०७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here