Maharashtra SSC Result 2021 l दहावीचा आज निकाल; कुठे, कसा चेक कराल? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल SSC Results 2021 आज शुक्रवार (16 जुलै) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांनी यासंदर्भात माहिती दिली.

maharashtra-board-ssc-result-2021-today-date-and-time-marathi-check-result-mh-ssc-ac-in-class-x-10th-results-official-website-online-at-mahahsscboard-news-update
maharashtra-board-ssc-result-2021-today-date-and-time-marathi-check-result-mh-ssc-ac-in-class-x-10th-results-official-website-online-at-mahahsscboard-news-update

मुंबई:महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल SSC Results 2021 आज शुक्रवार (16 जुलै) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांनी यासंदर्भात माहिती दिली. दहावीच्या विद्यार्थी-पालकांची उत्सुकता वाढली आहे. Maharashtra Board SSC Result 2021 Today Date and Time Marathi Check result mh ssc ac in Class X 10th results official website online at mahahsscboard

16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी

एकूण आठ माध्यमांतर्गत 2020-21 वर्षातील एसएससी (इयत्ता दहावी ) परीक्षेला एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय शिक्षण मंडळांमार्फत सन 2021 मध्ये इ. 10 वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण जाहीर केले जातील.

निकाल कुठे पाहणार?

सन 2021 मध्ये इयत्ता दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

या वेबसाईटस वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

निकाल कसा पाहाल ? How to Check Maharashtra SSC Result 2021

>>निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

>>त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

>>त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

>>त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.

>>यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.

>>निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

दहावीच्या निकालाचं काय आहे सूत्र?

दहावीचा निकाल लावताना नववी आणि दहावीसाठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट 2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ. 10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे.

  1. विद्यार्थ्यांचे इ 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन – 30 गुण
  2. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन – 20 गुण

3.विद्यार्थ्यांचा इ. 9 वी च्या अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here