मुंबई: महाराष्ट्र सरकारने लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात सुरू केल्यापासून राज्यात दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा सातत्याने बदलताना दिसत आहे. बुधवारी दिवसभरात राज्यात जो मृतांचा आकडा १६३ होता, तो वाढून गुरुवारी १९७ झाला आहे.
आतापर्यंत राज्यातील मृतांचा एकूण आकडा १ लाख १९ हजार ८५९ इतका झाला असून राज्याचा मृत्यूदर २ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. गुरुवारच्या या आकडेवारीनुसार मृत्यूदर गेल्या १५ ते २० दिवसांमध्ये १.९५ वरून २ टक्क्यांवर आल्याचं पाहायला मिळत आहे.
मृतांचा आकडा ही प्रशासनासाठी चिंतेची बाब कायम राहिली आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या Delta Plus Variant मुळे आरोग्य प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज दिवसभरात ९ हजार ८४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या आजपर्यंत कोरोनाबाधित झालेल्या नागरिकांचा आकडा आता ६० लाख ७ हजार ४३१ इतका झाला आहे.
#CoronavirusUpdates
24th June, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/MKBuL34gpb— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 24, 2021
यामध्ये १ लाख २१ हजार ७६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे दिवसभरात ९ हजार ३७१ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा राज्यातला आकडा ५७ लाख ६२ हजार ६६१ इतका झाला आहे. त्यापाठोपाठ राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९५.९३ टक्के इतका झाला आहे.
हेही वाचा : घाईघाईने निर्बंध शिथिल करु नका, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली ‘ही’ भीती!
मुंबई महानगर पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शहरात आज दिवसभरात ७८९ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे शहरातल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ७ लाख २४ हजार ११३ झाला आहे. मात्र, त्याचवेळी मुबईत आज दिवसभरात ५४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
त्यामुळे एकूण रुग्णसंख्येतील डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा ६ लाख ९१ हजार ६७० इतका आहे. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे मुंबईत दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रोजच्या मृत्यूंचा आकडा पुन्हा दोनअंकी होऊ लागल्याचं स्पष्ट झालं आहे. आजपर्यंत कोरोनामुळे मुंबईत १५ हजार ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
























































































































































