दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजाच्या वेदना व दुःख भाजपा महायुतीला कळलेच नाही, ५ हजारात दिवाळी कशी होणार ? हर्षवर्धन सपकाळ.

The BJP-led alliance has completely failed to grasp the pain and suffering of the farmers devastated by drought; how are they expected to celebrate Diwali on just 5,000 rupees? — Harshvardhan Sapkal
The BJP-led alliance has completely failed to grasp the pain and suffering of the farmers devastated by drought; how are they expected to celebrate Diwali on just 5,000 rupees? — Harshvardhan Sapkal

मुंबई:राज्यातील शेतकरी अस्मानी संकटाने पुरता हवालदिल झाला आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम हातातून गेला आहे, दसरा दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. दिवाळीचा सण कसा करायचा हा यक्षप्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे, मायबाप सरकार मदतीला धावून येईल अशी अपेक्षा असताना सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. प्रचंड महागाई असताना ५ हजार रुपयात दिवाळी कशी करणार?, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वाशिम जिल्ह्यातील किनवड, मालेगाव, पांडव उमरा, तांदळी, कामठवाडा येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अमित झनक, वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल चौधरी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस दिलीप सरनाईक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवादही साधला.

प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, गेल्या ७५ दिवसांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे खरीप हंगाम पूर्णपणे कोलमडला आहे. पिकं करपली, सोयाबीनच्या शेंगांत दाणे नाहीत, उत्पादनाची आशा मावळली; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. अस्मानी संकटाने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना महायुती सरकारच्या असंवेदनशीलतेने त्याच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. दिवाळी गोड करण्याच्या वल्गना करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने अवघ्या ५ हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. शेतकऱ्यांच्या दुःखाचा अपमान करणाऱ्या आणि आपली जबाबदारी झटकणाऱ्या सरकारचा त्यांनी निषेध केला.

शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदतीची खैरात नको, हेक्टरी १ लाख रुपये सरसकट मदत आणि संपूर्ण कर्जमाफी हवी, जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या, शेतमजुरांना सानुग्रह अनुदान, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन झाले पाहिजे. सर्वेक्षण, बैठका आणि घोषणांचे फार्स बंद करा आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा करा. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष थांबणार नाही असेही सपकाळ म्हणाले.

शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी पाच हजार रुपये जमा करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here