अभिनेता शाहरुख खान ‘पठाण’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासोबतच त्याने अन्य दोन नवीन प्रोजेक्टदेखील साइन केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या शाहरुख तीन चित्रपटांवर काम करत आहे.
दोन वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटांसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे तो लवकरच पठाणव्यतिरिक्त राजकुमार हिरानी आणि दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली कुमार यांच्या चित्रपटांमध्येही झळकणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एटली दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटाने नाव ’सनकी’ असं असून शाहरुख खान यात डबल रोल साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
‘डुप्लिकेट’ आणि ‘डॉन’ या चित्रपटानंतर शाहरुख खान तिसऱ्यांदा दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अद्याप या चित्रपटाचं नाव स्पष्ट झालं नसलं तरीदेखील यात तो वडील आणि मुलगा अशा दोन भूमिका साकारणार आहे.
वाचा l ‘’माझ्या मागे ईडी लावली तर, मी सीडी लावेल’’;एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा
दरम्यान, पुढील वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल असं म्हटलं जात आहे. सध्या शाहरुख खान पठाण या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण स्क्रीन शेअर करणार आहे.






















































































































































































