Best Freezer Hacks: फ्रिजरमध्ये बर्फ साचलेला बर्फ कसा काढावा? जाणून घ्या सोपी टिप्स, पाहा Viral Video

freezer-hacks-try-potato-slices-hacks-to-prevent-ice-buildup-in-your-freezer-news-update
freezer-hacks-try-potato-slices-hacks-to-prevent-ice-buildup-in-your-freezer-news-update

जेव्हा तुमचा फ्रिजरमध्ये एखादे भांडे ठेवता तेव्हा ते चिकटून बसते आणि खूप प्रयत्न करूनही ते सहजसहजी निघत नाही. कित्येकदा फ्रिजरमध्ये बर्फ साचून साचून कडक होऊन जातो जो वितळवणे सोपे काम नसते. तुमच्यासह असे होत असेल तर काळजी करू नका आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे फ्रिजरमध्ये कोणतेही भांडे चिकटून बसणार नाही आणि बर्फ साचून कडकही होणार नाही.

या समस्येतून सुटका देणारा उपाय जाणून घेऊ या

फ्रिजरमध्ये बर्फ होऊ नये म्हणून फक्त एक बटाटा वापराचा आहे. सोशल मिडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये ही ट्रिक सांगितली आहे. इंस्टाग्रावर vardanpakwan या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ही ट्रिक खूप काम करते असा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vardan Pakwan (@vardanpakwan)

 फ्रिजरमध्ये बर्फ साचलेला बर्फ कसा काढावा?

>>आधी एक बटाटा घ्या आणि त्याला दोन भागांमध्ये कापा

>>त्यानंतर कापलेला बटाट्याचे तुकडे करा आणि पुर्ण फ्रिजरमध्ये व्यवस्थित चोळून करा.

>>एकही कोपरा सुटणार नाही याची काळजी घ्या.

 सोपा उपाय तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकते असा दावा या व्हायरल व्हिडीओमध्ये केला आहे. यामुळे तुमच्या फ्रिजमध्ये बर्फ कडक होणार नाही. तुम्ही फ्रिजरमध्ये हवे ते सामान ठेवू शकता कारण ते बर्फामुळे चिकटणार नाही आणि सहज काढता येईल. हा उपाय काम करतो की हे स्वत: वापरून पाहा आणि परिणाम जाणून घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here