Little Bicycle Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती दिसत आहे; जी उद्यानामध्ये सायकल चालवत आहे. पण, ही सायकल इतकी छोटी आहे की, जी पाहताना खेळण्यातील दिसतेय. पण इतक्यात छोट्या सायकललादेखील ती वृद्ध व्यक्ती अगदी सहजपणे पेंडल मारत चालवत आहे. त्याचा हा पराक्रम पाहून उद्यानामधील लोक आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. कारण- एवढी छोटी सायकल तोल सांभाळून चालवणे प्रत्येकालाच जमण्यासारखे नाही.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर अनेक युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. त्याबाबत एका युजरने लिहिलेय की, हे खरे टॅलेंट आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय की, छोटी सायकल ठीक आहे; पण त्या व्यक्तीचा ‘बॅलन्स’ कमाल आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी लाइक केले आहे. त्यामुळे ही सायकल आता अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.
महागड्या कार बाजार आहेत कार शौकीनही बरेच आहे परंतु व्यायामासाठी असो वा जवळच्या प्रवासासाठी असो; काही जण सायकललाच प्राधान्य देतात. स्वस्तात मस्त प्रवासासाठी सायकलला पसंती दिली जाते. त्यामुळे गावापासून शहरापर्यंत लोक आवडीने सायकल वापरतात. लहान मुलांनाही सायकल खूप आवडते. पण, बदलत्या काळानुसार सायकलमध्येही अनेक बदल दिसून येत आहेत. एक व्यक्ती अशी एक अनोखी सायकल चालवतेय; जी पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. ही व्यक्ती शूजच्या आकारापेक्षाही लहान सायकल चालवताना दिसत आहे; ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.