Corona updates : भारतात ४४ लाखांचा टप्पा पार

२४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे रुग्ण ; पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक ६५ हजार ३६१ रुग्ण

maharashtra-Corona-Update-9812-new-corona-patients-registered-in-the-state-156-patients-died-news-update
maharashtra-Corona-Update-9812-new-corona-patients-registered-in-the-state-156-patients-died-news-update

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा कहर सुरुच आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने ४४ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ४४ लाख ६५ हजार ८६४ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ९ लाख १९ हजार १८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून ३४ लाख ७१ हजार ७८४ जणांना उपचारानंतर घरी सोडवण्यात आलं आहे.  कोरोनामुळे आतापर्यंत ७५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी २३ हजार ८१६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १३ हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून २४ तासांत ३२५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आालेल्या ४८ लाख ८३ हजार नमुन्यांपैकी ९ लाख ६७ हजार ३४९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत ६ लाख ८६ हजार ४६२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९६ टक्यांवर पोहोचले आहे. राज्यात १६ लाख ११ हजार २८० व्यक्ती घरगुती अलगीकरणामध्ये, तर ३७,६४४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.  

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here