धनंजय मुंडे प्रकरणात नवा ट्विस्ट,रेणू शर्मा हनीट्रॅप रचणारी महिला;भाजप नेते कृष्णा हेगडेंचा आरोप

new-twist-in-dhananjay-munde-case-bjp-former-mla-krishna-hegde-allegations-against-renu-sharma
new-twist-in-dhananjay-munde-case-bjp-former-mla-krishna-hegde-allegations-against-renu-sharma

मुंबई : धनंजय मुंडे Dhananjay Munde प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहेत. धनंजय मुंडेंवर आरोप करणारी महिला रेणू शर्मा हनीट्रॅप रचणारी महिला आहे, मला 2010 पासून जाळ्यात ओढत होती; असा आरोप भाजपचे माजी आमदार आणि उपाध्यक्ष कृष्णा हेगडे Krishna Hegde यांनी केला आहे. हेगडे यांनी आंबोली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. अशी माहिती त्यांनी एबीपी माझ्याशी बोलताना दिली आहे.

कृष्णा हेगडे म्हणाले की, रेणू शर्मा मला विविध नंबरवरून फोन करत होती. एसएमएस करत होती. ‘’आप मुझसे रिश्ते क्यू नही बनाते,’’ अशा प्रकारचे मॅसेज करत होती. त्या महिलेची माहिती काढली असता, ती महिला पैसे उकळण्याचे काम करते अशी माहिती मित्रांकडून मिळाली. अशी माहिती हेगडे यांनी दिली. त्या महिलेचे नंबर ब्लॉक केल्यानंतर ती वेगवेगळ्या नंबरवरून, लँडलाईन फोनवरून मला फोन करत होती, असाही आरोप हेगडे यांनी केला आहे.

धनंजय मुंडेविरुध्द त्या महिलेने तक्रार दिली उद्या इतर कुणाच्या विरोधात ती महिला तक्रार देऊ शकते. त्यामुळे आज मी त्या महिलेबद्दल अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांच्या वरिष्ठ अधिका-यांना सविस्तर माहिती दिली. अशीही माहिती हेगडे यांनी पोलिसांना दिली आहे.

6 आणि 7 जानेवारी 2021 रोजीही तिने मला व्हॉट्सअॅप केले

“मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं, की मी तुला भेटण्यात अजिबात रस नाही, मग तिच्या मागणीनुसार रिलेशनशीप ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी 6 आणि 7 जानेवारी 2021 रोजीही तिने मला व्हॉट्सअॅप केले. मी थंबचा इमोजी पाठवण्याशिवाय काहीच रिप्लाय दिला नाही” अशी माहिती कृष्णा हेगडे यांनी पत्रात दिली.

“दोन दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मीडियामध्ये केलेले आरोप वाचून मी थक्क झालो. त्याच वेळी मी रेणू शर्माबद्दल तुम्हाला सांगण्याचा निर्णय घेतला” असंही कृष्णा हेगडेंनी सांगितलं.

पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन तातडीने पुढील पावलं उचलली जातील

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राष्ट्रवादीची अडचण झाली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन तातडीने पुढील पावलं उचलली जातील असं शरद पवारांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

हेही वाचा : दुसऱ्यांचे खांदे भाडयाने घेऊन शेतकऱ्यांवर बंदुका चालवू नयेत

“धनंजय मुंडे काल मला स्वत: भेटले. यावेळी त्यांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती मला दिली. त्यांच्या माहितीनुसार, त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते, त्यातून काही तक्रारी झाल्या. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाली आणि आता चौकशी प्रक्रिया सुरु झाली असेल.

हे प्रकरण असं होईल आणि व्यक्तीगत हल्ले होतील असा अंदाज असावा म्हणून आधीच त्यांनी हायकोर्टात जाऊन आपलं म्हणणं मांडलं असेल. त्यांनी आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे त्याच्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाही,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

“त्या आरोपाचं स्वरुप गंभीर आहे. यासंबंधी पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. पक्षातील प्रमुख नेत्यांशी अद्याप चर्चा झालेली नाही. सर्वांना विश्वासात घेऊन विषय मांडणार आहे. मुंडे यांनी मला सखोल आणि सविस्तर माहिती दिली असून ती इतर सहकाऱ्यांना सांगणं माझ कर्तव्य आहे.

त्यांचं मत घेऊन पुढील पाऊलं टाकलं जातील. याला जास्त वेळ लागेल असं वाटत नाही. कोर्टातील गोष्टींमध्ये मी पडत नाही, पण पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागलीत ते तातडीने घेऊ,” अशी माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : धनंजय मुंडेंचा तो कौटुंबिक प्रश्न,सरकारला कोणताही फरक पडणार नाही : संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here