IPL 2020 : राशिदच्या फिरकीपुढे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, हैदराबादचा पहिला विजय

बेअरस्टोची अर्धशतकी खेळी, राशिद खानचे ३ बळी

Defeat of Delhi Capitals before Rashid's spin, first victory of Hyderabad
IPL 2020 : राशिदच्या फिरकीपुढे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, हैदराबादचा पहिला विजय Defeat of Delhi Capitals before Rashid's spin, first victory of Hyderabad

अबुधाबी : दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या (DelhiCapitals)सामन्यात सनरायजर्झ हैदराबादने (Sunrisers Hyderabad)आपला स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. प्रथम  फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने २० षटकात ४ बाद १६२ धावा केल्या. जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक आणि त्याला वॉर्नर, विल्यमसन यांच्या फटकेबाजीची मिळालेली साथ यांच्या जोरावर हैदराबादच्या संघाने १६०पार मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाकडून कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. राशिद खानच्या फिरकीपुढे दिल्लीला १५ धावांनी हार पत्करावी लागली. (Sunrisers Hyderabad won by 15 runs)

 सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) केल्या ४ बाद १६२ धावा

नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने २० ओव्हरमध्ये ४ बाद १६२ धावा केल्या. सलामीच्या जोडीने शानदार फलंदाजी केली. जॉनी ब्रेअरस्टोने सर्वाधिक ५३ धावा केल्या तर डेव्हिड वॉर्नरने ४५ धावा करुन त्याला छान साथ दिली. मनिष पांडे ३ धावा करुन बाद झाला. केन विल्यमसनने ४१ आणि अब्दुल समदने नाबाद १२ धावा केल्या. अभिषेक शर्माने नाबाद १ धाव केली. दिल्ली कॅपिटल्सच्या कॅगिसो रबाडा आणि अमित मिश्रा या दोन गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals)  २० ओव्हरमध्ये ७ बाद १४७ धावा केल्या

धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ २ धावा करुन परतला. शिखर धवन ३४, श्रेयस अय्यर १७, रिषभ पंत २८, शिमरॉन हेटमायर २१, मार्कस स्टोइनिस ११, अक्षर पटेल ५ धावा करुन परतला. कॅगिसो रबाडाने नाबाद १५ आणि अनरिचने नाबाद ३ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्स २० ओव्हरमध्ये ७ बाद १४७ धावा एवढीच मजल मारू शकली.

राशिद खानने दिल्ली कॅपिटल्सच्या तीन प्रमुख फलंदाजांना केले बाद

सनरायजर्स हैदराबादच्या राशिद खानने सलामीवीर शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत या तीन प्रमुख फलंदाजांना बाद केले. भुवनेश्वर कुमारने पृथ्वी शॉ आणि शिमरॉन हेटमायर या दोघांना माघारी धाडले. टी. नटराजनने मार्कस स्टोइनिसला तर खलिल अहमदने अक्षर पटेलला बाद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here