मुकेश अंबानींची ६ महिन्यात दर तासाला ९० कोटींची कमाई

earning-of-90-crores-every-hour-mukesh-ambani-is-moving-fast-towards
earning-of-90-crores-every-hour-mukesh-ambani-is-moving-fast-towards

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) एमडी तथा अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) भारत (India) आणि आशियातील (Asia) सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest Person) आहेत. आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२०च्या मते, यावर्षी मार्चच्या लॉकडाऊनपासून मुकेश अंबानी यांनी दर तासाला ९० कोटी रुपये कमावले आहेत.

मुकेश अंबानी यांची वैयक्तिक संपत्ती २,७७,७०० कोटी रुपयांनी वाढून ६,५८,४०० कोटी रुपये एवढी झाली आहे. ज्यांनी सिलिकॉन व्हॅलीच्या टेकन एलोन मस्क आणि अल्फाबेटचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन आणि लॅरी पेज यांना मागे टाकत जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान पटकवला आहे. कोरोनो व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान सुरूवातीच्या काळात मुकेश अंबानी यांची संपत्ती २८ टक्क्यांनी कमी होऊन ३,५०,००० कोटींवर गेली होती.

दरम्यान, फेसबुक, गुगल आणि इतर अनेक जागतिक कंपन्यांनी जिओ आणि रिटेलमध्ये गुंतवणूक केल्याने फक्त ४ महिन्यात त्यांच्या टक्केवारीत सुधारणा झाली आणि ते आता जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत थेट चौथ्या स्थानी पोहचले आहेत.

कोविड -१९ च्या संसर्गामुळे करण्यात लॉकडाऊन दरम्यान रिलायन्सची मार्केट कॅपही १० लाख कोटींवर गेली तर मुकेश अंबानींच्या संपत्तीत ७३% वाढ झाली.  जागतिक श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी हे टॉप-५ मध्ये असणारे एकमेव भारतीय आहेत. दुसरीकडे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानी आहेत.

TOP-5  भारतीय अब्जाधीश

  1. मुकेश अंबानी:मालमत्ता: 6,58,400 कोटी… 2019 पासून संपत्तीत बदल: 73%… कंपनी: रिलायन्स इंडस्ट्रीज
  2. हिंदुजा ब्रदर्स:मालमत्ता: 1,43,700 कोटी… 2019 पासून संपत्तीत बदलः -23%… कंपनी: हिंदुजा
  3. शिव नाडर आणि कुटुंब:मालमत्ता: 1,41,700 कोटी… 2019 पासून संपत्तीत बदलः 34%… कंपनी: एचसीएल
  4. गौतम अदानी आणि परिवार:मालमत्ता: 1,40,200 कोटी… 2019 पासून संपत्तीत बदलः 48%… कंपनी: अदानी
  5. अजीम प्रेमजी आणि परिवार:मालमत्ता: 1,14,400 कोटी… 2019 पासून संपत्तीत बदलः -2%… कंपनी: विप्रो    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here