”आमच्या ड्रायक्लीनरकडे अशी काय कला होती”;खडसेंची फडणवीसांवर टीका

get-well-soon-eknath-khadse-wishes-devendra-fadnavis-for-speedy-recovery
eknath-khadse-bjp-cleanchit-drycleaners-attacks-devendra-fadnavis

मुंबई : भाजपाचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख ‘ड्रायक्लीनर’ असं करुन त्यांच्यावर तोफ डागली. देवेंद्रजींनी ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्या सर्वांना क्लीनचीट दिली. आमच्या ड्रायक्लीनरकडे पण अशी काय कला होती, इतक्या लोकांना दिली पण मला देऊ शकले नाही. अशी जोरदार टीका खडसे यांनी फडणवीसांवर केली.

काही दिवसांपासून पक्षापासून दूर गेलेले खडसे यांनी अखेर मौन सोडत थेट फडणवीस यांनाच सवाल केला आहे. सातत्यानं राज्यातील पक्ष नेत्यांविषयी नाव न घेता आरोप करणाऱ्या खडसे यांनी पहिल्यादाच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख केला असून, त्यांना ड्रायक्लीनर असं संबोधलं आहे. खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना थेट फडणवीस यांनाच काही सवाल केले आहेत. विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आल्यानंतर खडसे नाराज झाले होते. त्यांनी ही नाराजी वारंवार व्यक्तही केली होती. मात्र, आता खडसे यांनी थेट फडणवीस यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

“पक्षाकडे मी वारंवार हे सांगितलं आहे. ज्यांनी हे केलंय, त्यांच्याकडून याची उत्तर घ्या. ज्यांनी अशा स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप केले. ज्यांनी तिकीट देण्यामध्ये अडथळे निर्माण केले. ज्यांनी तिकीट देऊन हरवण्याचा प्रयत्न केला. याचे सारे पुरावे दिले आहेत. तर सहा महिने झाले निवडणूक होऊन पक्ष त्यावर कार्यवाही का करत नाही. निदान आम्हाला बोलून तरी विचारा. मी पुरावे दिले आहेत. व्हिडीओ कॅसेट दिल्या आहेत. रेकॉर्डिंग दिलं आहे. वर्तमानपत्राची कात्रण दिली आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी कारवाई करण्याचं मान्य केलं होतं. मग कारवाई करायला विलंब का होतोय. माझ राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांना जाब विचारण्याची हिंमत पक्षामध्ये आहे का?, एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असं विचारलं पाहिजे. खरं असेल तर करा,” असं खडसे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here