तुमचं Paytm अकाउंट असलेला फोन हरवला? असं करा ब्लॉक किंवा डिलीट!

how-to-block-and-delete-lost-phone-paytm-account-check-paytm-helpline-and-details-update
how-to-block-and-delete-lost-phone-paytm-account-check-paytm-helpline-and-details-update

सर्वत्र ऑनलाइन, डिजीटल व्यवहार वाढले आहेत. त्यात Paytm चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अगदी टपरीवरील चहावाल्या पासून ते कोणत्याही मॉलपर्यंत Paytm ची सुविधा मिळते. पण कधी Paytm Account असलेला फोन हरवला किंवा चोरी झाला, तर काय होईल? फोन चोरी झाल्यास, Paytm Wallet मधून UPI द्वारे तुमचं बँक अकाउंट खाली होऊ शकतं. परंतु एका ट्रिकद्वारे फोन चोरी झाल्यानंतर Paytm Account ब्लॉक किंवा डिलीट करता येऊ शकतं.

फोनमधून असं लॉगआउट करा Paytm Account 

<<Paytm ने एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. सर्वात आधी त्या नंबरवर कॉल करा. Paytm Payments Bank – 01204456456

<<कॉल रिसीव्ह झाल्यानंतर ‘Lost Phone’ अर्थात फोन हरवला असल्याचा ऑप्शन निवडा.

<<आता तुमच्याकडे इतर कोणताही दुसरा नंबर मागितला जाईल. इथे तुमच्या आई-वडिलांचा किंवा कोणत्याही विश्वासू व्यक्तीचा Alternative Number देऊ शकता.

<<Alternative Number टाकल्यानंतर तुमचा हरवलेला मोबाइल नंबर सबमिट करा.

<<इथे ‘Log out from all device’ चा पर्याय निवडा. त्यानंतर हरवलेल्या स्मार्टफोनमधून तुमचं Paytm Account लॉगआउट होईल. त्यानंतर इतर कोणीही व्यक्ती तुमच्या अकाउंटमध्ये लॉगइन करू शकणार नाही.

Paytm Account ब्लॉक करण्यासाठी 

>>तुमच्या फोनमधून वरील स्टेप्सनुसार Paytm Account लॉगआउट केल्यानंतर ते ब्लॉक करायचं असल्यास, Paytm वेबसाइट ’24×7 help’ चा पर्याय निवडा.

 >>इथे ‘Report a fraud’ हा पर्याय निवडा.

>>फ्रॉड रिपोर्ट केल्यानंतर Paytm कडून तुमच्या Paytm Account ची सत्यता पडताळणी होईल. त्यासाठी Message Us या बटणावर क्लिक करावं लागेल.

>>इथे तुमचं पेटीएम स्टेटमेंट, बँक स्टेटमेंट यापैकी कोणतंही अकाउंट सबमिट करू शकता, जेणेकरुन ब्लॉक होणारं अकाउंट तुमचंच आहे याची खात्री होईल.

>>सर्व वेरिफिकेशननंतर Paytm कडून तुमची रिक्वेस्ट अप्रुव्ह केली जाईल आणि तुमचं पेटीएम अकाउंट ब्लॉक केलं जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here