अखेर घोळ मिटला; अंतिम वर्षाची परीक्षा द्या घरी बसून!

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा, ३१ ऑक्टोबरपर्यंत लागणार निकाल

notice-to-school-those-not-include-information-in-udise-plus-portal-hold-wages-of-teachers-news-updat-today
notice-to-school-those-not-include-information-in-udise-plus-portal-hold-wages-of-teachers-news-updat-today

मुंबई : राज्यातील अंतिम सत्राच्या परीक्षांचा घोळ सुरु होता. अखेर विद्यार्थ्यांनी घरी बसून परीक्षा देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली. त्यामुळे तो घोळ मिटला. याबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा होतील असं उदय सामंत यांनी सांगितलं असून महिना अखेपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती त्यांनी दिली आहे. राज्यपाल आणि कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. उद्या १२ वाजता अंतिम अहवाल सादर केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

“घरात बसून परीक्षा झाली पाहिजे यासाठी आमचा आग्रह होता. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. परीक्षा घेण्यासंबंधी ऑनलाइन, ऑफलाइन असे चार प्रकार असून त्यासंबंधी अंतिम अहवाल आज रात्रीपर्यंत तयार होईल. उद्या शासनाला तो प्राप्त होईल. अहवाल मिळाल्यांतर कोणतीही मुदत न घेता तातडीने विद्यापीठांकडे पाठवू,” असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

“सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावून युजीसीला विनंती करण्याबाबत निर्णय घेऊ. ३१ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व निकाल लावू शकतो ही जी कुलगुरुंनी भूमिका घेतली आहे ती आम्ही युजीसीकडे मांडू,” असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

प्रॅक्टिकल परीक्षाही विद्यार्थ्यांना केंद्रावर न जाता देणार येणार यासाठी प्रयत्न

“१५ ते ३० सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या प्रॅक्टिकल परीक्षा सोप्या पद्धतीने घेतल्या जातील. यासंबंधी कुलगुरु निर्णय घेत आहेत. प्रॅक्टिकल परीक्षादेखील विद्यार्थ्यांना केंद्रावर न येता देता यावी यासाठी प्रयत्न असून तसाच अहवाल तयार करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात परीक्षा गेऊन ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल द्यावा अशा पद्धतीच्या सूचना कुलगुरुंना केल्या असून कुलपती या नात्याने राज्यपालांनीही त्याच सूचना केल्या आहेत,” असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

१५ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याचा प्रयत्न

प्रॅक्टिकल परीक्षा “१५ ते ३० सप्टेंबर दरम्यान घेण्याचा प्रयत्न असणार आहे. परीक्षेच्या तारखा संबंधित विद्यापीठं अंतिम करणार आहेत. पण सध्या ज्या तारखा ठरवत आहोत त्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा होतील अशीच शक्यता आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असणार आहे,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here