Covid-19 Vaccine Registration l लससाठी नोंदणी कशी कराल?; जाणून घ्या ‘या’ स्टेप्स

how-to-register-online-and-check-slot-booking-availability-in-maharashtra-news-update
how-to-register-online-and-check-slot-booking-availability-in-maharashtra-news-update

कोविन अ‍ॅपवरुन नोंदणी करुन स्लॉट पद्धतीने कोरोनाच्या लसीसाठी बुकींग केल्यानंतरच लस दिली जणार आहे. ४५ वर्षांवरील व्यक्तींची ज्या पद्धतीने नोंदणी करण्यात आली तशीच नोंदणी करण्याची प्रक्रिया १८ वर्षांवरील सर्वांसाठी असेल, असं केंद्रीय आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. HowTo Register Online And Check Slot Booking Availability In Maharashtra News Update

लसीकरण सर्वांसाठी खुले करण्यात आल्याने लशीची मागणी वाढणार असून, गर्दी टाळण्यासाठी लशीची आगाऊ नोंदणी करून वेळ ठरवून घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे १८-४४ या वयोगटातील नागरिकांना नोंदणी करूनच लस घेता येईल, असे केंद्राने म्हटले आहे. मात्र, ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण केंद्रात जाऊनही नोंदणी करून लस घेता येईल.

१८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी ‘कोविन’ किंवा ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅपवर नोंदणी करता येईल. लसीकरणाची प्रक्रिया व कागदपत्रे या सर्व अटी सारख्याच असतील. लसीकरणावेळी आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. तुमचा मोबाइल क्रमांक आधारकार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे. या टप्प्यात लस घेण्यासाठी नाव नोंदणी कशी करायची जाणून घेऊयात…

कशी कराल लसीकरणासाठी नोंदणी?

>>cowin.gov.in संकेतस्थळावर जा आणि तुमचा मोबाईल क्रमांक टाका

>>मोबाईलवर आलेला ओटीपी दिलेल्या जागेत भरून Verify वर क्लिक करा.

>>ओटीपी व्हॅलिडेट झाल्यावर व्हॅक्सिनसाठीच्या नोंदणीचं पेज उघडेल. इथे तुमची माहिती भरा आणि Register वर क्लिक करा.

>>तुम्हाला मोबाईलवर नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज येईल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दाखवले जातील. या पेजवर तुम्ही लसीकरणासाठीची अपॉइंटमेंट निवडू शकता.

>>एका मोबाईल क्रमांकावर एकूण ४ लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करण्याची परवानगी असेल. यासाठी नोंदणी करताना सर्व सदस्यांची माहिती भरणं आवश्यक असेल.

>>आरोग्य सेतू मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून देखील तुम्हाला नोंदणी करता येऊ शकेल. यासाठी अ‍ॅपवर स्वतंत्र लिंक देण्यात आली असून तिथे नोंदणीसाठी तुम्हाला तुमचं नाव, वय, लिंग अशी माहिती भरून नोंदणी करता येऊ शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here