सरकार पाडण्यात भाजपा कधीच यशस्वी होणार नाही : शरद पवार

sharad-pawar-slams-narendra-modi-government-over-petrol-diesel-price-hike
sharad-pawar-slams-narendra-modi-government-over-petrol-diesel-price-hike

मुंबई l महाविकास आघाडीचं सरकार maha vikas aghadi पाडण्यासाठी भाजपाने bjp कितीही प्रयत्न केले तरीही त्यांना कधीच यश मिळणार नाही. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार Sharad pawar यांनी केलं आहे.

राज्यातील सत्ताधारी पक्षांना येणाऱ्या ईडीच्या नोटीसा म्हणजे केंद्राकडून होणारा सत्तेचा दुरुपयोग आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी भाजपावर निशाणा साधला. आधी त्यांना दोन महिन्यात सरकार पाडायचं होतं, मग सहा महिन्यात सरकार पाडणार होते, आठ महिन्यातही सरकार पाडणार होते. पण यापैकी काहीही होऊ शकलं नाही असंही पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी ईडीच्या नोटीसांवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. ईडीमार्फत करण्यात येणारी कारवाई हा सत्तेचा दुरुपयोग आहे. ईडीने मलाही नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्यांनी ही नोटीस परत घेतली.

मी बँकेच्या बोर्डाचा सदस्य नव्हतो आणि त्या बँकेत माझं खातंही नव्हतं. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने महिन्यात एक वर्ष पूर्ण झालं आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांच्या विचारधारा भिन्न असल्याने हे सरकार पडेल असं भाजपाला वाटत होतं. मात्र तसं झालं नाही.”

हेही वाचा : मोठी बातमी : महाराष्ट्रात ३१ जानेवारीपर्यंत निर्बंध कायम

२०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपाने निवडणूक एकत्र लढवली होती. मात्र मुख्यमंत्रिपदावरुन वाद झाल्याने दोन्ही पक्षांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात सत्ता काबीज केली.

हेही वाचा : Mohammad Azharuddin l मोहम्मद अझहरुद्दीन यांच्या गाडीला अपघात,बालंबाल बचावले

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर भाजपाने हे सरकार पाडण्यासाठी आम्ही काहीही प्रयत्न करणार नाही हे सरकार अंतर्विरोधाने पडेल अशी टीका भाजपाने वारंवार केली.

मात्र आता शरद पवार यांनी भाजपावर टीका करत महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षांसाठी स्थिर आहे. सरकार पाडण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना कधीही यश येणार नाही या शब्दात सुनावलं आहे.

हेही वाचा : इनकम टैक्स रिटर्न की आखिरी तारीख अब 10 जनवरी 2021 हुई

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here