Unlock 5.0 guidelines : १५ ऑक्टोबरपासून शाळा, सुरू करण्यास परवानगी, पण…

चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स, थिअटर सुरू करण्यास परवानगी

india-unlock-5-0-guidelines-cinema-halls-schools-can-open-unlock-5-0-guidelines
india-unlock-5-0-guidelines-cinema-halls-schools-can-open-unlock-5-0-guidelines

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउन सुरु आहे. केंद्र सरकारनं आर्थिक व्यवहार सुरू करण्याबरोबरच विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियम शिथिल करणं सुरू केलं आहे. लॉकडाउन वाढवत असतानाच केंद्र सरकारनं अनलॉकच्या ५व्या (unlock 5.0 guidelines) टप्प्यात चित्रपटगृह व शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असली, तरी शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्यांकडे सोपवला आहे.

अनलॉक ४चा टप्पा संपल्यानंतर केंद्र सरकारनं अनलॉकच्या ५व्या टप्प्याची घोषणा केली आहे. अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात केंद्र सरकारनं चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. चित्रपटगृह सुरू करण्यासाठी केंद्र सरकारनं एकूण क्षमतेच्या ५० टक्केच प्रेक्षकांना प्रवेश देण्याचे निर्देश दिले आहेत.

चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स, थिअटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश देता येईल. प्रेक्षकांना बसवण्यासंदर्भातील नियमावली माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात येईल, असं केंद्रानं म्हटलं आहे.

त्याचबरोबर राज्य सरकारं सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासही केंद्रानं संमती दिली आहे. मात्र, अशा कार्यक्रमांना १०० व्यक्तीची मर्यादा घालण्यात आलेली आहे. सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना केंद्रानं अगोदरच परवानगी दिली आहे. मात्र, हे कार्यक्रम कंटेनमेंट झोनमध्ये आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. खेळाडूंसाठी स्वीमिंग पूल सुरू करण्यासही केंद्रानं परवानगी दिली आहे. केंद्रीय क्रीडा व युवा मंत्रालयानं जाहीर केलेल्या नियमावलीचं पालन करण्यात यावं, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई महानगर प्रदेशाअंतर्गत येणाऱ्या अनावश्यक वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या उद्योगांना उत्पादन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारनं राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य व केंद्र सरकारनं दिलेल्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून ही रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत.

मुंबईतील डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन व कोविड मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेशातील लोकल रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारनं मुंबईतील डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. मुंबई महानगर प्रदेशात अर्थात एमएमआर विभागात डबेवाल्यांना रेल्वेतून प्रवास करण्यात येणार असून, त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडून क्यूआर कोड देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here