कंगना पुन्हा म्हणाली,पाकिस्तानशी तुलना करणं योग्यचं होतं

kangana-ranaut-mistake-while-addressing-father-of-indian-cinema-dadasaheb-phalke
kangana-ranaut-mistake-while-addressing-father-of-indian-cinema-dadasaheb-phalke

मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. त्यानंतर कंगनाला भाजपचा उघडपणे पाठिंबा मिळाला. आज कंगना मनाली येथे परतली आहे. मला वाटतंय पाकिस्तानशी तुलना करणं योग्यचं होतं. अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं आहे.

कंगना ट्विटमध्ये म्हणाली

“मी जड मनाने मुंबईतून जात आहे. गेल्या काही दिवसांत मला प्रचंड त्रास दिला गेला. माझ्यावर हल्ला झाला. खोटे आरोप केले गेले. माझं कार्यालय तोडलं. माझं घर तोडण्याची धमकी दिली गेली. सुरक्षारक्षक हत्यारं घेऊन माझं संरक्षण करतायत. मला वाटतंय पाकिस्तानशी तुलना करणं योग्यचं होतं.” मुंबई सोडताना कंगनाने अशा आशयाचं ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे तिने पुन्हा एकदा आपल्या टीकाकारांवर निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत आहे. ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ या वक्तव्यानंतर अनेकांना कंगनाला मुंबईत न येण्याची ताकीद दिली होती. यावर कंगनानं ‘महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, काय उखडायचं ते उखडा’, असं म्हटलं होतं. परंतु कंगनाने आज पुन्हा ट्विट केल्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here