सामनाचे पत्रकार राहुल डोलारे यांचे कोरोनामुळे निधन

journalist -rahul-dolare-dies-due-to-covid19- in-aurangabad
journalist -rahul-dolare-dies-due-to-covid19-in-aurangabad

औरंगाबाद : कोरोनाने पुन्हा एका पत्रकाराचा बळी घेतला आहे. औरंगाबादेत दैनिक सामनाचे ज्येष्ठ पत्रकार राहुल डोलारे यांचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू होते. ते ४९ वर्षांचे होते.

राहुल डोलारे यांची आठवडाभरापूर्वी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर आधी चिकलठाण्यातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here