Maharashtra Heavy Rain l जळगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार! 600 जनावरे वाहून गेली; 20 लोकांच्या मृत्यूची शक्यता

राज्यातील जळगाव मधील चाळीसगाव तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. तालुक्यात जवळपास पंधरा गावांमध्ये पाणी शिरंल आहे. तसेच जणावरे वाहून गेल्याच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. तालुक्यात अनेक गावांमध्ये अद्यापही पाणी साचलेलं आहे.

maharashtra-today-flood-situation- heavy-rain-in-chalisgaon-taluka-death-of-civilians-animals-carried-away
maharashtra-today-flood-situation- heavy-rain-in-chalisgaon-taluka-death-of-civilians-animals-carried-away

जळगाव l राज्यात अनेक ठिकाणी आज पावसाला सुरवात झाली आहे. राज्यातील जळगाव मधील चाळीसगाव तालुक्यात पावसाने थैमान Flood situation In Chalisgaon Taluka घातले आहे. या तालुक्यातील अनेक गाव पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे या तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास ६०० जनावरे वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. तालुक्यात मोठं नुकसान झाल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण MLA Mangesh Chavan यांनी दिली आहे.

तालुक्यात जवळपास पंधरा गावांमध्ये पाणी शिरंल आहे. तसेच जणावरे वाहून गेल्याच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. तालुक्यात अनेक गावांमध्ये अद्यापही पाणी साचलेलं आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

वाहतूकीवर परिणाम…

तालुक्यात अनेक पुल देखील पाण्याखील गेली आहेत. त्यामुळे याचा वाहतूकीवर परिणाम मोठा परीणाम झाला आहे. हे पाणी नागरी वस्तींमध्ये शिरल्यामुळं अनेक ठीकाणी बाजारपेठा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे.

या पुरामुळे मोठं नुकसान…

आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, स्थानिक लोकांशी माझं बोलणं झाल आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत आम्ही घाटात आहोत. या ठीकाणी मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु आहे. ५०० ते ६०० गुरं पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. तर काही दगावली आहेत. तसेच सकाळपासून ३ ते ४ मृतदेह मी बघितले आहेत.

८ ते १० लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व प्रशासन कामाला लागलं आहे. या पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. पंचनामे केल्यानंतर ते कळेल. पंचनामे करण्याच्या सुचना महसूल विभागाला केल्या आहेत. तालुक्यातील ८ ते १० गावांना या पुराचा फटका बसला आहे.

हेही वाचा

Maharashtra Rains l औरंगाबादेत कन्नड-चाळीसगाव सीमेवर ढगफुटी, दरड कोसळल्याने वाहने अडकली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here