अँटिलिया प्रकरणी NIA तोंडावर आपटली, NIA ने लावलेल्या UAPA च्या वैधतेवर न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह, भाजपाकडून तपास यंत्रणांचा दुरुपयोग पुन्हा उघड: सचिन सावंत

अँटिलियाचे काही आरोपी समोर येऊ नये यासाठीच भाजपाकडून कुभांड रचले, काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर अँटिलिया प्रकरणाच्या मुळापर्यंत जावून सर्व गुन्हेगारांना शिक्षा देऊ.

NIA suffers a major setback in the Antilia case; court questions the validity of the UAPA charges invoked by the agency; BJP's misuse of investigative agencies exposed once again: Sachin Sawant
NIA suffers a major setback in the Antilia case; court questions the validity of the UAPA charges invoked by the agency; BJP's misuse of investigative agencies exposed once again: Sachin Sawant

मुंबई:अँटिलिया बॉम्ब प्रकरणी न्यायालयाने UAPA लावण्याच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने NIA च्या तपासावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवला होता, ते आरोपी ताब्यात घेणार हे पाहताच मोदी सरकारच्या आदेशानुसार NIA ने हे प्रकरण हाती घेतले. या प्रकरणाचा दहशतवादाशी संबंध जोडून आपला हेतू साध्य करण्याचा डाव होता पण हे सर्व आता उघडे पडले आहेत. भाजपाने मविआ सरकारला बदनाम करणे एवढ्यासाठीच नव्हे तर काही आरोपी समोर येऊच नयेत यासाठी हे सर्व कुभांड रचले होते. भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय फायद्यासाठी कसा गैरवापर करते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून काँग्रेस सरकार आल्यानंतर अँटिलीया प्रकरणाच्या मुळापर्यंत जावू, असा इशारा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत यांनी दिला आहे.

टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सचिन सावंत पुढे म्हणाले की, अँटिलिया प्रकरणी अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. या प्रकरणी तिहार जेलमधून दहशतवादी संघटनेच्या नावाचा Email कसा आला? Cyber expert ने दिलेला जबाबाचे काय झाले? मुंबई पोलिस कार्यालयातील DVR हा ATS ने ताब्यात घेतला होता, तो परत का मागविला गेला? त्याचे पुढे काय झाले? सर्वात महत्वाचे म्हणजे या कटाचा मुळ उद्देश काय होता? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात NIA अपयशी ठरली आहे. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झालेला नाही व काहींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, यावर निवृत्त ACP भीमराव घाडगे यांनाही एक याचिका दाखल केली आहे.

NIA कडे पहलगाव दहशतावादी हल्ला, पुलवामा बॉम्हहल्ला, लाल किल्ल्यावरील हल्ला या प्रकरणांचाही तपास आहे पण या सर्व प्रकरणातील तपासात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दुर्दैवाने दहशतवादाशी जुडलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याऐवजी राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी  केंद्रीय तपास यंत्रणाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला गेला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहारमध्ये झिरो FIR नोंदवून CRPC चे उल्लंघन करत हे प्रकरण CBI कडे सोपवण्यात आले.

AIIMS सारख्या संस्थेचा अहवाल असतानाही CBI पाच वर्षे या प्रकरणावर बसून राहिली. शेवटी या प्रकरणाचे सत्य बाहेर आले व मुंबई पोलिसांचाच तपास योग्य होता हे सिद्ध झाले. पालघर साधू हत्याकांडाच्या तपासाचाही भाजपाने राजकीय फायद्यासाठी वापर केला. गेले वर्षभर सीबीआय या तपासावर बसून राहिली आहे असे सचिन सावंत म्हणाले. 

भाजपा सरकारने महाराष्ट्राचा बिहार बनवला.. 

ठाण्यात शिवसेना (UBT) पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, ही घटना अत्यंत गंभीर आहे. ठाण्यात रात्री गस्तीवर असताना पोलीस उपनिक्षक किसन भोईर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. भाजपा आमदार श्वेता महाले यांनी बुलढाण्याचा बिहार झाला असे म्हटले आहे, खरे तर महाराष्ट्राचाच बिहार झाला आहे.

सत्ताधारी भाजपाच्या आमदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला हा घरचा आहेर आहे. सातारा जिल्ह्यातील एका शेतात ड्रग्जची फॅक्टरी चालते, राजरोसपणे ड्रग्जचा काळाधंदा सुरु आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली आहे, असेही सचिन सावंत म्हणाले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here