Micromax In 1 मायक्रोमॅक्स इन वन ए Micromax In 1A स्मार्टफोनचे उद्या लाँचिंग

micromax-to-launch-in-series-on-3-nov
micromax-to-launch-in-series-on-3-nov

मायक्रोमॅक्स ही भारतीय कंपनी Micromax India नव्या दमाने मैदानात उतरत आहे. कंपनी ‘चिनी कम’ करण्यासाठी मायक्रोमॅक्स इन वन (Micromax In 1) आणि मायक्रोमॅक्स इन वन ए (Micromax In 1A) असे दोन स्मार्टफोन मंगळवार 3 नोव्हेंबर रोजी लाँच करणार आहे.

मोबाइल लाँचिग सोहळा दुपारी १२ वाजल्यापासून फेसबुकवर लाइव्ह केला जाईल. (Micromax to launch In series on Nov 3) मायक्रोमॅक्स Micromax India ही भारतात स्वस्तात दर्जेदार स्मार्टफोनसाठी लोकप्रिय कंपनी होती. मात्र चिनी कंपन्यांच्या आक्रमणामुळे मायक्रोमॅक्सची पिछेहाट झाली होती. आता कोरोना संकट आणि भारत-चीन संघर्षामुऴे भारतासह जगभर चीनविरोधी वातावरण निर्माण झाले आहे.

या वातावरणाचा फायदा घेत मायक्रोमॅक्स कंपनी नव्या मोबाइलसह भारतात दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. पुनरागमनासाठी मायक्रोमॅक्स इन (In – India) ब्रँड अंतर्गत दोन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली आहे.

मायक्रोमॅक्स कंपनीच्या नव्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबाबत चर्चेला उधाण आले आहे. अधिकृतरित्या लाँचिंग सोहळ्यात मायक्रोमॅक्स कंपनी त्यांच्या नव्या मोबाइलची वैशिष्ट्ये जाहीर करेल.

या मोबाइलना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभल्यास मायक्रोमॅक्स ठराविक अंतराने वेगवेगळ्या नवनवे मोबाइल लाँच करणार आहे. मोबाइलच्या बाजारात आक्रमक मुसंडी मारण्यासाठी कंपनी उत्सुक आहे. 

कंपनीने चुका आणि उणिवा दूर करत मोबाइलच्या बाजारात दमदार रिएन्ट्रीचे संकेत दिले आहेत. कंपनी मागील काही दिवसांपासून अधिकृत फेसबुक पेजवरुन मोबाइल संदर्भात टिझ पोस्ट टाकून लाँचिंग सोहळ्याचे सातत्याने प्रमोशन करत आहे.

यामध्ये फोटो, व्हिडीओ यांचा समावेश आहे. नवनव्या फेसबुक पोस्टद्वारे कंपनी लाँच होणार असलेल्या मोबाइल संदर्भातल्या चर्चेला नवे मुद्दे पुरवत आहे.

नव्या मोबाइलमध्ये सेल्फी, फोटो आणि व्हिडीओसाठी दर्जेदार कॅमेऱ्याची व्यवस्था तसेच अॅप्स आणि असंख्य फाइल साठण्यासाठी भरपूर इनबिल्ट मेमरीची सोय असेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा l उपमुख्यमंत्री याद राखा,सुर्य चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत;शिवसेनेनं खडसावलं

सक्षम प्रोसेसर, आकर्षक स्क्रीन रिझोल्युशन अशी ग्राहकांना आकर्षून घेऊ शकणारी बरीच वैशिष्ट्ये या मोबाइलमध्ये असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here