IPL 2020 : UAE च्या तीन मैदानांवर रंगणार क्रिकेटचा थरार!

१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा

IPL 2020 Cricket thriller to be played at three UAE grounds
IPL 2020 Cricket thriller to be played at three UAE grounds

दिल्ली : भारतात कोरोनाच्या प्रादुर्भामुळे कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदाचा आयपीएल हंगाम युएईत आयोजित करण्यात आला आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात क्रिकेटचा थरार रंगणार आहे. त्याकडे करोडो क्रीडा प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. (IPL 2020 Cricket thriller to be played at three UAE grounds)

सध्या संपूर्ण जग करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढतं आहे. अशा परिस्थितीत आयपीएलसाठीही बीसीसीआय आणि सर्व संघमालकांनी खास उपाययोजना आखल्या आहेत. युएईमधील ३ मैदानांवर हे सामने खेळवले जातील. यंदाची स्पर्धा भारतात होणार नसल्यामुळे युएईमधील खेळपट्ट्यांशी जुळवून घेताना सर्व खेळाडूंचा विशेष कस लागणार आहे. 

एक-एक करुन सर्व संघ युएईत दाखल झाले असून आता परदेशी खेळाडूही हळुहळु आयपीएल खेळण्यासाठी युएईत येत आहेत. त्यामुळे सर्व क्रीडा प्रेमींना १९ सप्टेंबरची वाट पाहावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here