Sushant singh Rajput : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्याच; भाजप तोंडघशी

एम्सच्या पथकाने अंतिम अहवाल सीबीआयला सोपवला

no-murder-angle-in-actor-sushantsingh-rajput-case-says-aims-team-in-its-report
no-murder-angle-in-actor-sushantsingh-rajput-case-says-aims-team-in-its-report

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्याच केल्याचा अंतिम अहवाल एम्सच्या पथकाने सीबीआयला सोपवला आहे. (no-murder-angle-in-actor-sushant-singh-rajput-case-says-aims-team-in-its-report)  सुशांतसिंहचा खून झाल्याचा दावा या अहवालात पूर्णतः फेटाळून लावण्यात आल्यामुळे सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवरून राजकारण करून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी उतावीळ झालेला भाजप चांगलाच तोंडघशी पडला आहे.

एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.

वाचा : काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज काय आहे घटना click करा

एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं.

सुशांत सिंहचा १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात मृतदेह आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं असलं तरी ही हत्या असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय याप्रकरणी तपास करत असून आपण सर्व बाजूंची पडताळणी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here