मोदींचा वाढदिवस पडला महागात, फुग्यांच्या स्फोटात भाजप कार्यकर्ते जखमी

modi-governments-digital-strike-on-china-ban-on-43-mobile-apps
modi-governments-digital-strike-on-china-ban-on-43-mobile-apps

चेन्नई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला. देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान चेन्नईमध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी हेलियमचे फुगे फुटल्यामुळे भाजपाचे ३० पेक्षा अधिक कार्यकर्ते जखमी झाले.

तामिळनाडूनतील चेन्नईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान हेलियमच्या फुग्यांच्या स्फोट होऊन ३० कार्यकर्ते जखमी झाल्याची घटना घडली. सुदैवानं या घटनेत कोणत्याही कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाली नाही. अंबात्तूर या ठिकाणी साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमात हेलियम गॅसचे दोन हजार फुगे आकाशात सोडण्यात येणार होते. हा स्फोट झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. सर्व जखमींवर उपचार सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here