Ram Vilas Paswan : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

union-minister-ram-vilas-paswan-dies-in-delhi-at-age-74
union-minister-ram-vilas-paswan-dies-in-delhi-at-age-74

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन. गुरुवारी दिल्लीमध्ये त्यांनी घेतला अखेरचा श्वास. 74 वर्षीय पासवान मागील काही दिवसांपासून आजारी होते आणि दिल्लीच्या एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होता.

रामविलास पासवान हे ७४ वर्षांचे होते. वडिलांचे निधन झाल्याचं चिराग पासवान यांनी ट्वीट करुन सांगितलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये चिराग पासवान यांनी लिहिलं आहे, “पप्पा… आता तुम्ही या जगात नाहीत पण मला माहिती आहे तुम्ही जेथे कुठे आहात नेहमीच माझ्यासोबत असाल. मिस यू पापा.”

बिहारच्या राजकारणात रामविलास पासवान यांचा मोठा दबदबा आहे. पासवान यांनी १९६० च्या दशकात राजकारणाची सुरुवात केली. पहिल्यांदा आमदार राहिलेल्या पासवान यांनी हाजीपूर मतदारसंघातून ४ लाख मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे ते देशभर चर्चेत आले होते. १९८९ मध्ये विजयी झाल्यानंतर ते पहिल्यांदा व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते एच. डी. देवेगौडा यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. गुजराल सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री झाले. केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी रामविलास पासवान हे केंद्रीय मंत्री असतात असा त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here