corona : पुणे बनलं देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या असलेलं शहर

maharashtra-Corona-Update-9812-new-corona-patients-registered-in-the-state-156-patients-died-news-update
maharashtra-Corona-Update-9812-new-corona-patients-registered-in-the-state-156-patients-died-news-update

पुणे : कोरोनाचा कहर सुरुच आहे. पुणे शहरात सोमवारी १,९३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. राज्यातील पहिला रुग्ण हा पुण्यातच नोंदवला गेला होता. पुण्यातील रुग्णसंख्या ही १,७५,१०५ इतकी झाली असून दिल्लीची रुग्णसंख्या १,७४,७४८ आहे. त्यामुळे पुणे शहर हे देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेलं शहर बनलं आहे. (pune-becomes-capital-of-corona-patients)

पुण्यात सध्या देशातील सर्वाधिक ५२,१७२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जे मुंबईतील २०,००० आणि दिल्लीतील १५,००० यांच्यापेक्षा खूपच अधिक आहेत. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात आजवर ४,०६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १,१८,३२४ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती राज्याच्या आरोग्यविभागानं दिली आहे.

राज्यातील पहिला रुग्ण हा पुण्यातच नोंदवला गेला होता

देशात मार्च महिन्यात कोरोनाचा फैलाव सुरु झाला. तेव्हापासून पुणे जिल्हा प्रशासन यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील पहिला रुग्ण हा पुण्यातच नोंदवला गेला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे.

देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३६ लखांच्यावर

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३६,२१,२४५ वर पोहोचली. यांपैकी २७,७४,८०१ रुग्ण बरे झाले आहेत. तर आजवर ४ कोटी २३ लाख ०७ हजार ९१४ कोरोना नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here