Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतर, उस्मानाबादचे पुन्हा धाराशिव

chhatrapati-sambhajinagar-of-aurangabad-again-shinde-fadnavis-government-cabinet-meeting-news-update-today
chhatrapati-sambhajinagar-of-aurangabad-again-shinde-fadnavis-government-cabinet-meeting-news-update-today

मुंबई:औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतला आहे. तत्कालीन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते. पण, आता शिंदे सरकारने त्यात छत्रपती या शब्दाची भर घालत छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केले आहे. तसेच, उस्मानाबादचे (osmanabad) नामांतरदेखील धाराशिव (Dharashive) करण्यात आले आहे.

आज मंत्रीमंडळाने घेतलेले निर्णय हे उगवत्या सूर्याच्या साक्षीने घेतल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “आज मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय मावळत्या सरकारचे जबाबदारी झटकणारे निर्णय नाहीत. उगवत्या सूर्याच्या साक्षीने सरकारने जबाबदारी स्वीकारून घेतलेले निर्णय आहेत. या निर्णयांचा नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला फायदा होईल”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here