वीजबिल भण्यासाठी ऑनलाईन लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक, दोघांना अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

sewri-police-arrested-two-people-from-jharkhand-in-online-electric-bill-link-fraud-case-news-update

मुंबई: वीजबिल भरण्यासाठी बनावट ऑनलाइन लिंक पाठवून फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंबईतील शिवडी पोलिसांनी झारखंडच्या रांची येथून अटक केली आहे.

वीजबिल भरण्यासाठी बनावट ऑनलाइन लिंक पाठवून फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंबईतील शिवडी पोलिसांनी झारखंडच्या रांची येथून अटक केली आहे. वीरेंद्र अशोक लोहरा आणि उमेश परमेश्वर साव अशी या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही ग्राहकांना वीज कनेक्शन कापण्याची धमकी देत फसवणूक करत होते. ग्राहकांना फोन करून ”तुमचं वीजबिल थकले आहे. त्यामुळे तुमची वीज जोडणी कापण्यात येत आहे, ही कारवाई थांबवण्यासाठी त्वरीत बील भरा, अशी धमकी देत होते. त्यानंतर वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांच्या मोबाईलवरुन एसएमएसद्वारे एक बनावट लिंक पाठवत, अशा प्रकारे या दोघांनी अनेकांची फसवणूक केल्याची माहिती आहे.

 दरम्यान, पोलिसांनी दोघांना रांची येथून अटक केली असून दोघांनी लोकांकडून नेमके किती पैसे उकळले याचा तपास शिवडी पोलीस करत आहेत. तसेच अशा धमक्यांना घाबरून नागरिकांनी बनावट लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here