सहकाऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र समृद्ध झाला, साखर कारखाने, सुत गिरण्या, दूध संघ, सहकारी बँका, पतसंस्था जाळे विणले: बाळासाहेब थोरात

Maharashtra has prospered through the cooperative sector; a vast network of sugar factories, spinning mills, milk unions, cooperative banks, and credit societies has been woven: Balasaheb Thorat
Maharashtra has prospered through the cooperative sector; a vast network of sugar factories, spinning mills, milk unions, cooperative banks, and credit societies has been woven: Balasaheb Thorat

मुंबई:देशाच्या प्रगतीत सहकार विभागाचे महत्व फार मोठे आहे.स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सहकाराच्या माध्यमातून क्रांती करण्याचे स्वप्न पाहिले आणि १९५४ साली सुशिक्षित तरुणाईला राष्ट्र उभारणीसाठी सहकार क्षेत्रात काम करावे असे आवाहन केले होते. यातून एक मोठी चळवळ उभी राहिली साखर कारखाने, बँका, गृहनिर्माण संस्था, पतसंस्था, याची लाट आली. सहकार क्षेत्र उभे करण्यात काँग्रेसचाच मोठा आहे पण सध्या सत्तेत बसलेले लोक सहकाराचे नाहीत तर स्वाहाकाराचे आहेत. सहकार क्षेत्र संकटात असून ते वाचवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे सहकार विभागाच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सहकार विभागाच्या प्रमुख शुभांगी शेरेकर, प्रदेश काँग्रेसच्या वित्त विभागाचे प्रमुख विश्वास उटगी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देशाच्या व राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्वाचे योगदान आहे पण आज कार्पोरेटचा जमाना आहे. केंद्रात व राज्यातील सरकार हे हम दो, हमारे दो एवढ्यासाठीच  असून अदानी अंबानी यांच्या हाती छोटे मोठे उद्योग एकवटत आहेत. आज सहकार क्षेत्र जपणे नितांत गरजेचे आहे. सहकारातील काही बँका डुबल्या व त्यातील पैसे परत मिळतील का गंभीर प्रश्न आहे, त्यासाठी एखादी चळवळ उभी करता येईल का याचा विचार केला पाहिजे. पतसंस्था व सहकारी बँका, सहकार विभाग सक्षम राहिला पाहिजे असेही सपकाळ म्हणाले.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रातील सहकार चळवळ उभी करण्यात यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांनी फक्त शेती न करता उद्योगपती झाले पाहिजे व ते सहकारातून झाले पाहिजेत हे स्वप्न त्यांनी पाहिले. सहकाराच्या माध्यमातून राज्यभर बँका निर्माण झाल्या व सावकरांच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका झाली. तो वारसा वसंतदादा पाटील यांनी पुढे चालू ठेवला.

इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात हरित क्रांतीची सुरुवात झाली. १९७० ते १९९५ या काळात सहकारी क्षेत्रातून साखर कारखानदारी, सुत गिरण्या उभ्या राहिल्या. श्वेत क्रांती झाली. या २५ वर्षांत आपला महाराष्ट्र सहकाराच्या माध्यमातून समृद्ध झाला, हे परिवर्तन झाले याला क्रांती म्हणतात. आज सहकार क्षेत्रापुढे मोठी आव्हाने आहेत, त्याचा सामना करत सहकार क्षेत्र सक्षम केले पाहिजे. सहकाराचा विचार काँग्रेसने रुजवला तो वाढला पाहिजे, असे आवाहनही थोरात यांनी केले.

देश में ओबीसी का मुद्दा प्रमुखता से उठाने वाले एकमात्र नेता राहुल गांधी, सबसे पहले राहुल गांधी ने ही की जाति आधारित जनगणना की मांग: डॉ. सिरिवेल्ला प्रसाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here