फडणवीसांनी का दाबले होते अन्वय नाईक प्रकरण,सावंतांनी सांगितले ‘हे’ कारण…

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ते सचिन सावंत यांची माहिती

shivsena-sanjay-raut-warning-to-bjp-leader-kirit-somaiya-anvay-naik-suicide-case
shivsena-sanjay-raut-warning-to-bjp-leader-kirit-somaiya-anvay-naik-suicide-case

मुंबई l भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबावर जमीन व्यवहाराचे आरोप लावले. दरम्यान अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामीला अटक झाली होती. त्यामुळे भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधत आहे. सचिन सावंतांनी किरीट सोमय्यांना सुनावले आहेत. अन्वय नाईक प्रकरण ‘हे’  फडणवीस सरकारच्या काळात का दाबण्यात आले होते. याबाबत धक्कादायक माहिती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली.

‘दिवंगत अन्वय नाईक आत्महत्येसाठी जबाबदार व्यक्तीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या जमीन व्यवहाराला मधे आणून आपली व भाजपाची हीन मानसिकता दर्शवली. रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी यांचा भाजपाशी थेट संबंध आहे’ असा घणाघाती आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत म्हणाले की, ‘अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा व जमीन व्यवहाराचा संबंध काय? मराठी कुटुंबाची वाताहत झाली त्याचे सोमय्या यांना काहीही पडले नाही. फडणवीस सरकारने आत्महत्या प्रकरण दाबले कारण आरोपी भाजपा संबंधित आहे. भाजपासाठी काम करतो. भाजपा हा पक्ष महाराष्ट्र द्वेष्टा आहे हे स्पष्ट आहे.’ असा आरोप सावंतांनी भाजप आणि फडणवीसांवर लावला आहे.

हेही वाचा l ‘’सोमय्या फालतू आणि फडतूस, हातात कागद घेऊन गिधाडासारखा फडफडतोय’’ : संजय राऊत

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा आणि वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा किल्ल्यानजीक कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली आहे.

हेही वाचा l Drugs case l अर्जुन रामपालची एनसीबी कार्यालयात दोन तासांपासून चौकशी

माझी सासुरवाडी तेथून जवळच आहे, त्यामुळे आपणाला त्याची माहिती आहे, असा दावा सोमय्या यांनी केला होता. यावर नाईक कुटुंबीयांनी उत्तर देत हे सर्व व्यवहार खुले असल्याचे म्हटले आहे.

  

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here