चक्क अभिनेत्री झाली पुरुष; पत्नीसाठी लिंगबदल शस्त्रक्रिया

elliot-page-comes-out-as-transgender
elliot-page-comes-out-as-transgender

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री एलन पेज ELLEN PAGE हिने लिंगबदल शस्त्रक्रिया करुन पुरुष लिंग स्विकारले आहे. तिने एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. आता माझं नाव अॅलन नसून एलियॉट Elliot page पेज आहे.

तुम्ही मला स्त्री म्हणा किंवा पुरुष मला फरक पडत नाही. मी तेच केलं जे मला करायचं होतं. अशा आशयाची पोस्ट लिहून तिने एकच खळबळ उडवली आहे. एलन पेज ही हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

या सुपरहिट चित्रपटांमध्ये तिनं काम केलं

आजवर एक्स मेन, इन टू द फॉरेस्ट, इन्सेप्शन, जुनो यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे. अष्टपैलू अभिनय शैलीमुळे तिने हॉलिवूड सिनेसृष्टीत स्वत:च असं एक वेगळ स्थान प्रस्थापित केलं आहे.

परंतु एलन आता यापुढे अभिनेत्रींच्या भूमिकेत झळकणार नाही. कारण तिने लिंगबदल शस्त्रक्रिया करुन पुरुष लिंग स्विकारलं आहे.

“लहानपणापासून मला पुरुषांपेक्षा स्त्रियांप्रती जास्त आकर्षण होतं. त्यामुळे मी ट्रान्सजेंडर होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय काही लोकांना आवडलेला नाही. अनेकांनी माझ्यावर टीका देखील केली.

हेही वाचा l वर Flipstart सेल, इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

तुम्ही मला पुरुष म्हणा अथवा स्त्री मला काही फरक पडत नाही. मी तेच केलं जे मला करायचं होतं. लक्षात ठेवा आता माझं नाव एलन नसून एलियॉट पेज आहे.” अशा आशयाची पोस्ट लिहून एलियॉटने आपल्या भावना व्यक्त केल्या.

एलन गेली तीन वर्ष एमा पोर्टनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. अलिकडेच तिने आपल्या प्रेयसीसोबत लग्न केलं. पत्नीच्या प्रेमाखातर मी लिंग देखील बदलू शकते असं तिनं अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. 

हेही वाचा l यूपीतील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’; मनसेचा योगींवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here