
मुंबई: राज्याच्या राजकारणामध्ये आत्ताच्या घडीला अजित पवार (Ajit pawar) केंद्र बिंदू ठरलेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याची वारंवार चर्चा होत आहे. परंतु नव्या राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत, त्यात काही तथ्य नाही, अशी माहिती अजित पवार (Ajit pawar) यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
राज्याच्या राजकारणामध्ये आत्ताच्या घडीला अजित पवार केंद्र बिंदू ठरलेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याची वारंवार चर्चा होत आहे. परंतु नव्या राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत, त्यात काही तथ्य नाही, अशी माहिती अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत आहेत, असंही या वृत्तात म्हटलं आहे. परंतु अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, मीडिया स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवारांनी आमदारांची बैठक बोलावली नाही: अण्णा बनसोडे
दरम्यान, अजित पवार हे विधीमंडळातील आपल्या कार्यलयात पोहोचले आहेत. इथे ते गाठीभेटी घेणार असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीच अनेक आमदार मुंबईत दाखल झालेत. काही वेळात आलेले आमदार अजित पवार यांची भेट घेणार आहेत.
अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली नसून आम्ही आमदारच एकत्र भेटणार आहोत, अशी माहिती आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली आहे. तसंच दादा जिथे जातील तिथे अण्णा बनसोडे त्यांच्यासोबत असेल, आम्ही कायम त्यांच्यासोबत असू असंही बनसोडे यांनी सांगितलं आहे.





















































































































































































