“डिग्री काय, मोदी हा माणूसच बनावट! १९८३ च्या प्रमाणपत्रावर १९९२ साली डेव्हलप झालेला फॉन्ट कसा?”

not-only-pm-degree-modi-also-fake-font-on-1983-degree-certificate-is-develop-in-1992-maharashtra-congress-tweet-news-update-today
not-only-pm-degree-modi-also-fake-font-on-1983-degree-certificate-is-develop-in-1992-maharashtra-congress-tweet-news-update-today

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या शैक्षणिक पदवीवरून वाद सुरू आहे. विरोधी पक्षातील विविध नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पदवीवर संशय व्यक्त केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत मोदींच्या पदवीची माहिती मागवली होती. पण विद्यापीठाने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पदवीची माहिती देण्यास नकार दिला. याउलट गुजरातमधील न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांनाच २५ हजारांचा दंड ठोठावला.

यानंतर महाराष्ट्रासह देशातील विविध नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पदवीवर संशय व्यक्त केला. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही पदवीवरून पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला. “आपल्या पंतप्रधान मोदी यांची पदवी बोगस आहे, असे लोक म्हणतात. पण राज्यशास्त्रज्ञांनी याविषयावर संशोधन करून ही पदवी ऐतिहासिक आणि क्रांतीकारी असल्याचं मत मांडलं आहे. त्यामुळे त्याची एक प्रत फ्रेम करून नवीन संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावली पाहिजे. यामुळे जनता पंतप्रधानांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

 यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने एक ट्वीट करत “डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक (बनावट) आहे” असं म्हटलं आहे. संबंधित ट्विटमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा फोटो ट्वीट केला आहे. संबंधित पदवीत वापरलेला फॉन्ट हा १९९२ साली तयार करण्यात आला. मात्र, हा फॉन्ट पंतप्रधान मोदी यांच्या १९८३ सालच्या प्रमाणपत्रावर कसा काय? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

 महाराष्ट्र काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले, “जो फॉन्ट १९९२ साली तयार करण्यात आला, तो फॉन्ट मोदींच्या १९८३ सालच्या प्रमाणपत्रावर कसा? डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक आहे.” हे ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here