”मी पुन्हा येणार हे जनतेला आवडलं की नाही”?; खडसेंचा फडणवीसांना टोला

पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना

eknath-khadse-criticise-party-leaders
eknath-khadse-criticise-party-leaders

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. “निव्वळ मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का ? कोणत्या कारणासाठी ? याचा शोध मी घेत आहे. हे अलीकडे १०-१२ वर्षात जन्माला आलेले राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवत आहेत.”. असं म्हणत खडसेंनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपाचं एकट्याच्या बळावर सरकार आणलं होतं. त्या कालखंडात आत्ता आहेत त्यातील अनेक लोक नव्हतेसुद्धा. महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचं कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल हे सांगता येत नाही असा इशाराही खडसे यांनी दिला. आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

खडसे म्हणाले, कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपाचं एकट्याच्या बळावर सरकार आणलं होतं. त्या कालखंडात आत्ता आहेत त्यातील अनेक लोक नव्हतेसुद्धा. “मी गेल्या चाळीस वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहे. पण पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना आहे. करोनाचं सावट दूर झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here