High security number plate : छत्रपती संभाजीनगरात साडेसात लाख वाहने हायसिक्युरीटी नंबर प्लेटसाठी लांबच!

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी चौथ्यांदा मुदतवाढ!

छत्रपती संभाजीनगर : सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट High security number plate maharashtra बसविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित वाहनांना नवीन नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. आतपर्यंत तीन वेळा वाहनधारकांना मुदतवाढ देण्यात आली. १५ ऑगस्ट ही शेवटची मुदत होती परंतु वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवण्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर Chhatrapati sambhaji nagar जिह्यात हायसिक्युरीटी नंबरसाठी ९ लाख वाहनांपैकी २ लाख ४९ हजार ७६० वाहनांची ऑनलाईन नोंद करण्यात आली, त्यापैकी १ लाख ३२ हजार ९८१ वाहनांना हायसिक्युरीटी नंबर प्लेट बसवण्यात आली आहे.

प्लेटची वैशिष्टये…
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही. ही प्लेट वेगळ्या पध्दतीने बनवली जाते. कोणीही त्याची कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही. त्यामुळे वाहनांची सुरक्षा वाढते. त्याची चौरी व गैरवापर करता येत नाही. एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते. याच्या मदतीने जखमींच्या नातेवाइकांना माहिती पोहोचविता येते.

नंबर प्लेटची किंमत..
सर्व चारचाकी- ८७९ रुपये,
सर्व दुचाकी- ५३१ रुपये.
सर्व तीन चाकी- ५५० रुपये.

वाहन चोरीला आळा बसणार…
चिन्हांमध्ये एकसमानता आणण्यासाठी, महाराष्ट्रात एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी या नंबर प्लेट्सची फिटिंग अनिवार्य करण्यात आली होती आणि त्या बसविण्याची जबाबदारी उत्पादकांवर होती. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स या दुर्मिळ ॲल्युमिनियम मिश्रधातूपासून बनवलेल्या असतात. त्यात ‘इंडिया’ या पडताळणी शिलालेखासह एक रेट्रो-रिफ्लेक्टीव्ह फिल्म, क्रोमियम आधारित अशोक चक्र होलोग्राम, निळ्या रंगात हॉट-स्टॅम्प केलेले अक्षर आणि एक खास अनुक्रमांकाचे १० अंकी लेसर-ब्रेंडिंग आहे. यामुळे त्यात छेडछाड होण्याची शक्यता कमी आहे.

अशी मिळाली मुदतवाढ…
पहिला मुदतवाढ ३१ मार्च
दुसरी मुदतवाढ ३० जून
तिसरी मुदतवाढ १५ ऑगस्ट
चौथी मुदतवाढ ३० नोव्हेंबर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here