Mumbai Local Train l सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरू करण्याचा ‘असा’ आहे प्रस्ताव

राज्य सरकारचा लोकलबाबत रेल्वेला पत्र

government-written-to-railways-passengers-of-non-essential-category-in-non-peak-hours
government-written-to-railways-passengers-of-non-essential-category-in-non-peak-hours

मुंबई : मुंबई लोकल ट्रेन (Mumbai local train) अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. सर्वसामान्यांसाठी लोकलची सेवा सुरू करावी यासाठी राज्य सरकारने (Maharashtra government) रेल्वेला पत्र लिहिलं.

राज्य सरकारने रेल्वे विभागाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ठराविक वेळेनुसार सर्वसामान्य नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवासाची मुभा देण्यात यावी. तसेच राज्य सरकारकडून वेळेचा प्रस्तावही या पत्रामध्ये सादर करण्यात आला आहे. मात्र, सर्वसामान्यांसाठी ही लोकल ट्रेनची सेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.

वेळेपत्रकानुसार सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवासाची मुभा देण्यात यावी असं म्हटलं आहे. यासोबतच गर्दीच्या काळात जास्त लोकल ट्रेन्स सोडण्यात याव्यात असंही प्रस्तावात म्हटलं आहे.

राज्य सरकारचा असा आहे प्रस्ताव 

सर्वसामान्य नागरिकांना पास किंवा तिकीटावर पहाटे पहिली लोकल ते सकाळी ७.३० वाजेपर्यंत प्रवासाची मुभा

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी क्यूआर कोड, पास, आयकार्डसह तिकीट सकाळी ८ ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत प्रवासाची

सर्वसामान्य नागरिकांना सकाळी ११ ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत पास किंवा तिकीटावर प्रवास

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना संध्याकाळी ५ ते संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत प्रवास

सर्वसामान्य नागरिकांना रात्री ८ ते रात्री शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची मागणी

लेडीज स्पेशल ट्रेन प्रत्येक तासाला एक

हेही वाचा l walnuts Benefits अक्रोड खाण्याचे 10 फायदे जाणून घेऊयात

सर्वसामान्यांसाठी लोकलची सेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीये. तुर्तास राज्य सरकारकडून रेल्वे प्रशासनाला केवळ प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here