JEE, NEET परीक्षा पुढे ढकला : अभिनेता सोनू सूद

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालता कामा नये, सोनू सूदची ट्विट करत विनंती

(actor-sonu-sood-demand-to-postpone-jee-neet-exam )
(actor-sonu-sood-demand-to-postpone-jee-neet-exam )

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई (JEE) आणि नीट (NEET) परीक्षा पुढे ढकलण्याची  मागणी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने केली. सोनू सूदने ट्विट करत केंद्र सरकारला परीक्षा पुढे ढकलली जावी अशी विनंती केली आहे. (actor-sonu-sood-demand-to-postpone-jee-neet-exam )

करोना संकटात आपण विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालता कामा नये असं त्याने म्हटलं आहे असं सोनू सूदने ट्विटमध्ये म्हटलं आहे. “देशातील सध्याची परिस्थिती पाहता जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलली जावी अशी माझी भारत सरकारला विनंती आहे. सध्याच्या करोना स्थितीत आपण विद्यार्थ्यांबद्दल जास्त काळजी घेणं गरजेचं असून त्यांना संकटात टाकू नये”.

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना  केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीतही न्यायालयाने परीक्षा घेतली पाहिजे असा निर्वाळा दिला आहे. विशेष म्हणजे एनटीएने जेईई मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचं सांगितलं आहे. जेईई मुख्य परीक्षेसोबत नीट परीक्षाही वेळेतच होणार आहे. ही परीक्षा १३ सप्टेंबरला होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना कोरोना होण्याचा धोका असल्याचे लक्षात घेऊन सर्व परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नीट, जेईई, सीईटीसारख्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि देशातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सध्याचे जूनपासून सुरू झालेले नवे शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करावे, अशी मागणी पर्यावरणमंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here