poonam-pandey l पूनम पांडेला अश्लील फोटो,व्हिडिओ महागात पडलं, पोलिसांनी घेतलं ताब्यात

actress-poonam-pandey-detained-by-goa-police
actress-poonam-pandey-detained-by-goa-police

पणजी l अभिनेत्री मॉडेल पूनम पांडे poonam-pandey हिला सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडिओ करणं चांगलंच महागात पडलं आहे. कारण की, याचप्रकरणी गोवा पोलिसांनी आज (गुरुवार) तिला ताब्यात घेतलं आहे.

गोव्यातील अगौंदा रिसॉर्टमधून पूनम पांडे हिला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच याप्रकरणी फोटो शूट करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम पांडे हिने गोव्यातील चापोली धरणावर आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ शूट केलं होतं.

 

View this post on Instagram

 

Hey

A post shared by Poonam Pandey Bombay (@ipoonampandey) on

दरम्यान, यावेळी पूनम पांडे हिच्यासह तिचा पती सॅम बॉम्बे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कारण जेव्हा हे शूट सुरु होतं तेव्हा सॅम हा तिथेच उपस्थित होता. याशिवाय दोन साध्या वेषातील पोलीस देखील यावेळी तिथे हजर होते जे पूनमला संरक्षण देत असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा l  Gauhar khan l Bigg Boss विजेती गौहर खानचा 12 वर्ष लहान बॉयफ्रेंडसोबत झाला साखरपुडा

त्यामुळे या दोन्ही पोलिसांना देखील याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. तसंच धरणावर असणाऱ्या दोन सुरक्षा रक्षकांना देखील निलंबित करण्यात आलं आहे. या संपूर्ण व्हिडिओ शूटप्रकरणी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला विंगने पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

दुसरीकडे या प्रकरणी गोव्यातील काणकोण येथील नागरिकांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करावी यासाठी गुरुवारी बंदची हाक देखील देण्यात आली होती. मात्र, आता पूनम पांडेला ताब्यात घेतल्यानंतर हा बंद मागे घेतला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here