मुंबई : अभिनेत्रीला व्हिडीओ कॉल करुन त्याने केले हस्तमैथून

bollywood-actress-filed-complaint-againt-unknown-person-for-masturbating-on-video-call
bollywood-actress-filed-complaint-againt-unknown-person-for-masturbating-on-video-call

मुंबई l मुंबईत एका तरुणाने बॉलिवूड अभिनेत्रीला Bollywood-actress व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करुन हस्तमैथून केल्याचा masturbating-on-video-call धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईत ऑनलाईन हस्तमैथून करुन अभिनेत्रीला त्रास देण्याची ही दुसरी घटना आहे.

अभिनेत्रीने याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आत्मसंरक्षण प्रशिक्षणही देणाऱ्या या ३२ वर्षीय अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप याप्रकरणी अटक करण्यात आलेली नाही.

अभिनेत्रीने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दोन वेळा आपल्याला त्या क्रमांकावरुन फोन आला असता कट केला होता. युकेचा कोड असणाऱ्या या क्रमांकावरुन तिसऱ्यांदा फोन आला तेव्हा आपण चुकून तो स्वीकारला. यावेळी समोरील व्यक्ती हस्तमैथून करत होती. आपल्याला खूप मोठा धक्का बसला, मी त्याचे स्क्रिनशॉट घेतले आहेत.

यानंतरही अज्ञात व्यक्ती अभिनेत्रीला सतत मेसेज पाठवत होती. याशिवाय तिला नावाने हाक मारत होती. यानंतर अभिनेत्रीने ट्विटरच्या माध्यमातून आरोपीचे मेसेज आणि व्हिडीओ स्क्रीनशॉट शेअर केले.

या ट्विटमध्ये तिने मुंबई पोलिसांनाही टॅग केलं. आपण अडचणीत आल्याचं लक्षात येताच अज्ञात व्यक्तीने माफी मागत आपण २० वर्षीय विद्यार्थी असून चूक झाल्याचं म्हटलं.

आरोपीने आपले मेसेज आणि व्हिडीओ कॉल एका मैत्रीणीसाठी होते, तिच फोन क्रमांकही सारखाच असल्याचा दावा केल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

 एका स्क्रिप्टरायटरला तरुणाने व्हिडीओ कॉल करुन केला होता प्रकार

मुंबईत एका स्क्रिप्टरायटरला एका तरुणाने व्हिडीओ कॉलवरच हस्तमैथून केले होते. त्याबाबत खार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना जुलै 2019 मध्ये घडली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here