मुंबई l भाजपाचा स्टार प्रचारक अभिनेता विवेक ऑबेरॉय vivek oberoi याच्या घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून छापे मारल्यानंतर या प्रकरणात भाजपचा संबंध असल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे. ‘बॉलिवूडवर नशेबाजीचा आरोप करायचा, रोज तोच खोटारडेपणा मोठ्याने बोलून समोर आणायचा, पण पुराव्यांच्या नावाने ठणाणा. पण आता काय घडले?’ असा खोचक सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
बॉलिवूड आणि ड्रग्स प्रकरण यामुद्द्यांवर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. बॉलिवूडला हादरे देऊन हा संपूर्ण उद्योग उद्ध्वस्त करण्याचा डाव गंभीर आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. तर, विवेक ऑबेरॉय vivek oberoi याच्या बंगळुरातील घरी पोलिसांनी छापा टाकल्यानंतर शिवसेनेनंही काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
वाचा l NEET Result 2O2O l नीट परीक्षेत शोएब आफताबने देशात इतिहास रचला, 720 पैकी 720 गुण
‘बॉलिवूडवर नशेबाजीचा आरोप करायचा, रोज तोच खोटारडेपणा मोठ्याने बोलून समोर आणायचा, पण पुराव्यांच्या नावाने ठणाणा. पण आता काय घडले?’ असा खोचक प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे. ‘विवेक ऑबेरॉयच्या घरावर बंगळुरुच्या पोलिसांनी छापा टाकला. विवेकच्या बायकोचा भाऊ हा बंगळुरु ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आहे.
विवेक महाशय हे भाजप गोटातले म्हणून ओळखले जातात व पडद्यावर नरेंद्र मोदी यांची भूमिका विवेक ऑबेरॉयने vivek oberoi साकारली होती. या सर्व ड्रग्ज प्रकरणाशी विवेक ऑबेराय याचा संबंध असेल किंवा आहे, असं आम्ही म्हणणार नाही, पण कुठले धागे कुठे पोहोचतील याचा सध्या भरवसा नाही, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
बॉलिवूडला हादरे देऊन हा संपूर्ण उद्योग उद्ध्वस्त करण्याचा डाव गंभीर आहे. बॉलिवूडला बदनाम करायचे, खच्चीकरण करायचे व हा उद्योग इथून हलवायचा असे मनसुबे काहींनी रचले असतीलच. एका परीने महाराष्ट्राची, मुंबईची ओळख संपवायची असे काही तरी बंद पडलेल्या पडद्यामागून सुरू आहे, अशी टीकाही शिवसेनेनं केली आहे.
‘मुंबईतील बॉलिवूडच्या केसाला धक्का लागणार नाही. आंतरराष्ट्रीय वित्तिय केंद्र मुंबईतून हलवण्याइतके ते सोपे नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तर आहेच, पण मनोरंजन उद्योगाचीही राजधानी आहे. मुख्यमंत्र्यांनी या क्षेत्रातील प्रमुख लोकांशी चर्चा केली त्यांना दिलासा दिला हे योग्यच झाले.
दादासाहेब फाळके या मराठी माणसाने हिंदुस्तानी सिनेसृष्टीचा पाया मुंबई महाराष्ट्रात घातला. हा पाया कच्च्या पायावर उभा नाही. लवकरच पडदे जिवंत होतील, बॉलिवूडला जाग येईल, मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायला हवा,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. संपूर्ण प्रकरणावरुन शिवसेनेनं पुन्हा एकदा विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.

































































































































































[…] ‘विवेक ओबेरॉय भाजपच्या गोटातला, पण आ… […]