बापरे! डी-मार्टच्या मालकांनी मुंबईत १ हजार कोटींचं घेतलं घर

घराच्या खरेदीसाठी तब्बल 30 कोटी रुपयांची स्टँम्प ड्यूटी लागली

d-mart-owners-radhakrishnan-damani-buys-new-home-in-malabar-hill-for-1000-crores-news-updates
d-mart-owners-radhakrishnan-damani-buys-new-home-in-malabar-hill-for-1000-crores-news-updates

मुंबई: डी मार्डचे मालक D-mart-owners राधाकृष्णन दमानी Radhakrishnan-Damani यांनी मुंबईत तब्बल १ हजार कोटी रुपयांचं घर खरेदी Rs-1000-crore-in-mumbai केलं आहे. मुंबईतील हायप्रोफाईल समजल्या जाणा-या मलबार हिल Malabar-Hill येथील घराची त्यांनी खरेदी केली आहे.

मुंबईतील श्रीमंताचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिलमध्ये विक्रमी व्यवहाराची नोंद झाली आहे. मलबार हिलमध्ये तब्बल १ हजार कोटींचा घरखरेदीचा व्यवहार झाला आहे. डी-मार्ट रिटेल चेन चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी हे घर विकत घेतलं आहे. नारायण दाभोळकर मार्गावरील मधू कुंज या इमारतीत हे घर आहे.

मुंबईत समुद्रकिना-यावर असलेल्या अलिशान एरियात हा मोठा प्लॉट आहे. पुराचंद रॉयचंद अँड सन्स, परदेशचंद अँड सन्स आणि प्रेमचंद रॉयचंद सन्स या तिघांकडून दमानी आणि त्यांच्या भावाने हे घर खरेदी केले आहे.

५७५२.२२ चौरस फुटांच्या घराचा व्यवहार

या घराच्या खरेदीसाठी तब्बल 30 कोटी रुपयांची स्टँम्प ड्यूटी लागली आहे. बाजारभावानुसार या घराची किंमत ७२४ कोटी रुपये आहे. ५७५२.२२ चौरस फुटांच्या घराचा हा व्यवहार सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात चर्चेचा विषय आहे. ३१ मार्चला हा व्यवहार झाला.

कोण आहेत राधाकृष्ण दमानी

राधाकृष्ण दमानी हे ‘डी-मार्ट’चे मालक आहेत. भारतातल्या अनेक मोठ्या तसंच लहान शहरांमध्ये ‘डी-मार्ट’ च्या शाखा आहेत. ‘डी-मार्ट’मध्ये रोजच्या वापरातल्या किराणा मालासारख्या अनेक गोष्टी मिळतात. भारतातल्या किराणा मालाच्या अनेक यशस्वी चेन्सपैकी डी-मार्ट ही एक चेन आहे.

राधाकृष्ण दमानी यांना मिस्टर व्हाईट अँड व्हाईट म्हणून ओळखलं जातं…

भारतातील श्रीमंतांच्या यादीत राधाकृष्ण दमानी यांचा समावेश आहे. नेहमी पांढरा शर्ट आणि पांढरी पँट अशी स्टाईल असणाऱ्या राधाकृष्ण दमानी यांना मिस्टर व्हाईट अँड व्हाईट म्हणून ओळखलं जातं. राधाकृष्ण दमानी हे प्रसारमाध्यमं तसंच सोशल मीडिया या सर्व गोष्टींपासून दूरच असतात.

राधाकृष्ण दमानी शेअर बाजारातही गुंतवणूकदार आहेत. राधाकृष्ण दमानिया यांनी २०१७ मध्ये त्यांच्या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी केल्यानंतर दोनच दिवसांत संपत्तीमध्ये ६१०० कोटी रूपयांची वाढ झाली होती.

डिमार्टच्या माध्यमातून एव्हुन्यू सुपरमार्केट या देशभर पसरलेल्या रिटेलर शॉपचे दमानी मालक आहेत. फोबर्स इंडियाच्या 2020 मधील गर्भश्रीमंत लोकांच्या यादीत दमानी यांचं नाव असून त्यांची संपत्ती 15.4 बिलीयन्स डॉलर एवढी आहे. दमानी ते शेअर बाजारातील जानकार आणि गुंतवणूकदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here