धक्कादायक : महाराष्ट्रात आज ४९ हजार ४४७ कोरोनाबाधित सापडले, २७७ रूग्णांचा मृत्यू

राज्यात एकूण ४,०१,१७२ ॲक्टिव्ह रुग्ण

maharashtra-49447-new-covid-cases-and-277-deaths-in-the-last-24-hour-news-updates
maharashtra-49447-new-covid-cases-and-277-deaths-in-the-last-24-hour-news-updates

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याची चिन्हं दिसत आहेत. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे. आज दिवसभरात महाराष्ट्रात ४९ हजार ४४७ कोरोनाबाधित वाढले असून, २७७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. maharashtra-49447-new-covid-cases-and-277-deaths-in-the-last-24-hour-news-updates

सध्या राज्यातील मृत्यू दर १.८८ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५५ हजार ६५५ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तसेच, राज्यात आज रोजी एकूण ४,०१,१७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान आज दिवसभरात ३७ हजार ८२१ रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. तसेच, राज्यात आजपर्यंत एकूण २४,९५,३१५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.४९ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०३,४३,१२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,५३,५२३ (१४.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,५७,१३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here