LPG Price: एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात, जाणून घ्या नवे दर

indian-oil-cuts-prices-of-19-kg-commercial-lpg-news-update-today
indian-oil-cuts-prices-of-19-kg-commercial-lpg-news-update-today

नवी दिल्ली : इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. दिल्लीत इंडेनच्या १९ किलो व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ११५ रुपये ५ पैशांची कपात करण्यात आली आहे. तर कोलकात्यात ११३, मुंबईत ११५ रुपये ५ पैसे आणि चेन्नईमध्ये ११६ रुपये ५ पैशांनी हे दर कमी करण्यात आले आहेत. १ नोव्हेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंटसह आदींना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान घरगुती सिलिंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

नवे दर लागू झाल्यानंतर दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी १७४४, कोलकात्यात १८४६, मुंबईत १६९६ आणि चेन्नईत १८९३ रुपये मोजावे लागणार आहेत. १ ऑक्टोबर रोजी कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात आले होते. वाजवीपेक्षा या गॅस सिलिंडरची किंमत अधित होती. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात कमी आली होती. त्यामुळे कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमती जैसे थेच राहणार आहेत. ६ जुलै रोजी १४.२ किलोग्रॅमच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपये प्रति युनिटने वाढ करण्यात आली होती. यापूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत १९ मे २०२२ रोजी बदल करण्यात आले होते.

राजधानी दिल्लीत सध्या घरगुती वापराचा गॅस १०५३ रुपये प्रति युनिटने मिळतो. तर कोलकात, मुंबई, चेन्नईत अनुक्रमे १,०७९ रुपये, १,५२.५ रुपये आणि १,६८.५ रुपयांनी विकला जातो. स्थानिक पातळीवरील व्हॅटचे दर वेगवेगळे असतात. त्यामुळे घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीही वेगवेगळ्या असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here