राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे कोरोना पॉझिटिव्ह

रोहिणी खडसे यांच्यासोबत मुलगी सारा ही देखील करोना पॉझिटिव्ह

rohini-eknath-khadse-ncp-leader-tested-corona-positive
rohini-eknath-khadse-ncp-leader-tested-corona-positive

जळगाव l राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी महसूल-कृषीमंत्री एकनाथ खडसे Eknath khadse यांच्या कन्या सौ.रोहिणी खडसे-खेवलकर Rohini khadse यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली Covid positive आहे. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. रोहिणी खडसे यांच्यासोबत त्यांची मुलगी सारा ही देखील कोरोना पॉझिटिव्ह असून दोघींनाही जळगाव येथील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

रोहिणी खडसे Rohini khadse यांचं संपर्कात आलेल्या लोकांना आवाहन

माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने मागील ७-८ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी करोना चाचणी करुन घ्यावी ही विनंती. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच कोरोनावर मात करुन पुन्हा आपल्या सर्वांच्या सेवेत रुजू होईन.

 रोहिणी खडसेंवर ह्या डॉक्टरांच्या निगरानीखाली उपचार

डॉ.मिनाज पटेल, डॉ.सुयोग चौधरी, डॉ.गौरव पाटील, डॉ.प्रांजल खेवलकर, डॉ. मोइज देशपांडे, डॉ.प्रितेश नाईक, डॉ.अभिषेक ठाकूर, डॉ.प्रभाकर पाटील, व इतर डॉक्टर उपचार करीत आहेत.

रोहिणी खडसे दौ-यावर असताना लागण

एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हापासून त्यांच्या सतत बैठका आणि कार्यकर्त्यांशी संपर्क सुरु होता. राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रात बळकट करण्यासाठी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत आहेत.

हेही वाचा l नितीश कुमारांचा सोमवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी

आता त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांच्या मुलीचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here