
मुंबई: शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan)‘पठाण’ (Pathan) चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोज बाहेर आले होते. या फोटोजमुळे चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ निर्माण झाली होती. शाहरुख तब्बल ३ वर्षांनी मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने प्रेक्षक चांगलेच उत्सुक होते. त्यानंतर काही महिन्यांनी ‘पठाण’ची घोषणा करण्यात आली आणि अधिकृतरित्या जॉन अब्राहम, दीपिका पदूकोण आणि शाहरुख खान यांच्या पात्रांची पुसटशी ओळख करून देण्यात आली.
त्यानंतर सोशल मीडिया पठाण हा कायम ट्रेंडमध्ये आहे. आता पुन्हा या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची काही छायाचित्रे बाहेर आली आहेत. या फोटोमध्ये दीपिका आणि शाहरुख त्यांच्या चित्रपटाच्या लूकमध्ये दिसत आहेत. सोशल मीडियावर या फोटोची चांगलीच चर्चा होत आहे. फिल्मफेअरच्या सोशल मिडिया अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाबाबत प्रचंड गुप्तता पाळली असली तरी आता हळूहळू काही गोष्ट बाहेर येत आहेत. हे व्हायरल झालेले फोटो पाहून आता शाहरुखच्या ‘पठाण’च्या टीझरची वाट बघत आहेत. २ नोव्हेंबर म्हणजेच शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त ‘पठाण’चा टीझर पाहायला मिळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोशल मिडियावर तर याची चांगलीच चर्चा सुरू आहे. नेटीजन्सनी तर ‘पठाण टीझर’ हा हॅशटॅगसुद्धा ट्रेंड करायला सुरुवात केली आहे.
या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अधिकृत स्टेटमेंट आलं नसल्याने याचा टीझर उद्या येणार का हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे, पण शाहरुखचे चाहते त्याच्याकडून सरप्राइजची अपेक्षा ठेवून आहेत. पठाण २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला असून यातील सलमान खानच्या छोट्याशा भूमिकेचीही चांगलीच चर्चा होत आहे.