
पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटी गैरव्यवहार प्रकरणी (Teacher Eligibility Test Scam) मोठी कारवाई केली आहे. परिषदेने तब्बल ७ हजार ८८० उमेदवारांवर कारवाई केली आहे. या सर्वांना पुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा देता येणार नाही.
२०१९-२० साली घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये गैरव्यवहार करण्यात आला होता. या प्रकरणी पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. या घोटाळ्यात शिक्षण परिषद आयुक्त तुकाराम सुपेसह मोठ्या अधिका-यांना अटक करण्यात आली होती.
इतक नाहीत तर सायबर पोलिसांच्या हाती अनेक कोटींची संपत्ती हाती लागली होती. या सगळ्या उमेदवारांवर दोषारोप पत्र पुणे सत्र न्यायालयात दाखक करण्यात होते. त्यानंतर संबंधित उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई प्रशासन घेणार होते, ती आज घेण्यात आली. ज्या ७ हजार ८८० उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यापैकी जे उमेदवार सेवेत असतील त्यांची सेवा संपत करण्यात येणार आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ (१९ जाने. २०२०) च्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांच्या जर नियुक्त्या झाल्या असतील तर त्यांची सेवा तात्काळ संपविण्यात यावी. आणि याची नोंद नियुक्त्या झालेल्या विभागांनी घ्यावी असे आदेश या पत्रकात देण्यात आले आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकाहून एक खळबळजनक गोष्टी समोर आल्या होत्या. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७८८० परीक्षार्थीना पैसे घेऊन पास केलं असल्याचं समोर आलं होत.या उमेदवारांबाबत परीक्षा परिषदेने मोठी कारवाई केली आहे.या ७८८० उमेदवारांमधील २९३ उमेदवारांनी जी बनावट प्रमाणपत्र तयार केली होती आणि ते आज सेवेत आहे अश्या उमेदवारांना देखील बडतर्फ करण्यात येणार आहे.
https://mahatet.in/TET2021Document/MAHATET%202019.pdf
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक ४८० पानी पत्रक जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे यात परिषदेने गैरव्यवहार करणाऱ्या ७८८० उमेदवारांची यादीच जाहीर केली आहे.यात परीक्षा दिलेल्या या उमेदवारांना आता कधीही परीक्षा देता येणार नाही. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ज्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात येणार आहे.