WhatsApp: ‘या’ स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअॅप आजपासून चालणार नाही, पाहा ही लिस्ट

whatsapp-not-run-on-smartphones-from-tomorrow-see-full-list-update
whatsapp-not-run-on-smartphones-from-tomorrow-see-full-list-update

मुंबई: WhatsApp चे नवीन अपडेट आज म्हणजेच 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध होणार आहे. या अपडेटनंतर अनेक स्मार्टफोनमध्ये WhatsApp चालणार नाही. याचा फटका लाखो यूजर्सला बसणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटमुळे हे अॅप जुन्या फोन किंवा ऑपरेटिंग सिस्टममध्ये काम करणार नाही.

यामध्ये, फोन यूजर्संना फोनची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागेल किंवा त्यांना नवीन फोन घ्यावा लागेल. पण बर्‍याच जुन्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट होऊ शकत नाही. त्यामुळे यूजर्संना नवीन फोन घेण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

व्हॉट्सअॅपच्या या अपडेटमुळे केवळ अँड्रॉइड फोनच नाही तर इतर ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या फोनवरही परिणाम होणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे जुना आयफोन असेल तर त्यातही 1 नोव्हेंबरनंतर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरू शकणार नाही.

जर यूजर्सला WhatsApp वापरणं सुरू ठेवू इच्छित असल्यास, तुमच्या Android फोनमध्ये OS 4.1 किंवा त्यापेक्षा अधिक अपडेट असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, जर तुम्ही आयफोन यूजर्स असाल, तर तुमचा आयफोन iOS 10 किंवा त्यापेक्षा अधिक व्हर्जन असलेला हवा. KaiOS 2.5.0 किंवा नवीन OS वरही, WhatsApp पूर्वीप्रमाणेच काम करत राहील.

1 नोव्हेंबरपासून व्हॉट्सअॅप या डिव्हाइसवर काम करणार नाही.

Samsung: Galaxy Trend Lite, Galaxy Trend II, Galaxy SII, Galaxy S3 mini, Galaxy Xcover 2, Galaxy Core, Galaxy Ace 2.

ZTE: Grand S Flex, ZTE V956, Grand X Quad V987 and Grand Memo.

Sony: Xperia Miro, Xperia Neo L, and Xperia Arc S.

Alcatel, Archos 53 Platinum, HTC Desire 500, Caterpillar Cat B15, Wiko Cink Five, and Wiko Darknight, Lenovo A820 UMi X2, Run F1, THL W8.

LG: Lucid 2, Optimus F7, Optimus F5, Optimus L3 II, Dual Optimus L5, Best L5 II, Optimus L5, Dual Best L3 II, Optimus L7, Optimus L7, Dual Best L7 II, Optimus F6, Enact Optimus F3, Best L4 II, Best L2 II, Optimus Nitro HD, Optimus 4X HD and Optimus F3Q.

Huawei: Ascend G740, Ascend Mate, Ascend D Quad XL, Ascend D1 Quad XL, Ascend P1 S, and Ascend D2.

Apple: iPhone 6, iPhone 6s plus, iPhone SE. या स्मार्टफोनवर अपडेट नसल्यास व्हॉट्सअॅप चालू शकणार नाही.

या सॉफ्टवेअरपेक्षा कमी व्हर्जनमध्ये चालणाऱ्या फोनमध्ये WhatsApp काम करणार नाही. आता आपल्याला अशा मोबाइलची यादी सांगणार आहोत की, ज्यामध्ये 1 नोव्हेंबरपासून WhatsApp काम करणार नाही.

हेही वाचा – भाजपा आणि ड्रग्ज पेडलरच्या नात्यांबद्दल बोलूयात…;नवाब मलिकांनी शेअर केला अमृता फडणवीसांचा फोटो

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here